Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » प्रियकर मध्यरात्री प्रेयसीला भेटायला गेला अन सर्व संपवलं !
    क्राईम

    प्रियकर मध्यरात्री प्रेयसीला भेटायला गेला अन सर्व संपवलं !

    editor deskBy editor deskJanuary 14, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    राजस्थान : वृत्तसंस्था

    देशातील अनेक राज्यात प्रेम प्रकरणातून अनेक गुन्हेगारी घटना घडत असतांना नुकतेच राजस्थानमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. प्रेयसीसोबत झालेल्या वादातून प्रियकराने तरुणीची निर्घृणपणे हत्या केली आहे. पोलिसांना घटनेची माहीती मिळताच अवघ्या ६ तासांत या घटनेचा छडा लावला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानमधील भीलवाडा जिल्ह्यातील आसिंद गावात बुधवारी (ता.१०) रोजी ही धक्कादायक घटना घडलीये. पोलिसांना घटनेची माहीती मिळताच तात्काळ या घटनेचा तपास सुरू केला. त्यानंतर पोलिसांनी सायबर सेलच्या मदतीने अवघ्या ६ तासांत या घटनेचा छडा लावला. या घटनेत पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासोबत आणखी तिघांना ताब्यात घेतले आहे. आरोपींच्या केलेल्या चौकशीत हत्या केलेल्याचे कारण समजून पोलिसांनी धक्का बसला.

    मयत तरुणी बुधवारी (ता.१०) रोजी घराबाहेरील एका खोलीत झोपली होती आणि तिची आई ,वडील तसेच दोन लहान भाऊ घरात झोपले होते. सकाळी जेव्हा तिची आई तिच्या बाहेरील खोलीत आली असता तरुणीचा मृतदेह रक्ताने माखलेल्या अवस्थेत आढळून आला.त्यानंतर या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मयत तरुणी ही बीए प्रथम वर्षाची विद्यार्थिनी होती.मयत तरुणी (वय १८) आणि तिचा प्रियकर कैलास (वय २०) यांची साधारण सात- आठ महिन्यांपासून मैत्री होती. दोघांनाही लग्न करायचे असल्याचे समजते.आरोपी आणि तरुणी यांच्यात काही दिवसांपासून काही कारणावरुन सतत वाद सुरू होता.
    हत्येच्या रात्री दोघांचे फोनवर बोलणे झाले असता तरुणीचा प्रियकर हा त्याच्या मित्रांना तिला भेटण्यासाठी घेऊन आला होता. परंतू कैलासने त्याच्या दोन्ही मित्रांना गावाबाहेर सोडले आणि त्यानंतर तो तिच्या घरी गेला. काही वेळीनंतर त्यांच्यात वाद झाला. वादा इतका वाढला की तरुणाने तिच्यावर धारदार शस्त्राने वार करून तिची हत्या केली आणि हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी दुरुस्तीची अंतिम संधी

    December 13, 2025

    जळगावातील घरफोड्यांचा भंडाफोड; मध्यप्रदेशातील टोळी उघड

    December 13, 2025

    माझ्यावर एवढं प्रेम का? अमिताभ बच्चन यांचा मनाला स्पर्श करणारा ब्लॉग

    December 13, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.