Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पतीने पत्नीच्या खोट्या सही करून बँक खात्यातून पैसे काढल्या प्रकरणी गुन्हा दाखल
    क्राईम

    पतीने पत्नीच्या खोट्या सही करून बँक खात्यातून पैसे काढल्या प्रकरणी गुन्हा दाखल

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रDecember 15, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : जळगाव येथील एका कंपनीत पतीपत्नी काम करीत होते त्याच्या काही कौटुंबिक वाद झाले असता. त्या माहेरी निघून गेले असता बँकेत पत्नीच्या बनावट सह्या आणि कागदपत्र सादर करून  खात्यातून परस्पर पैसे काढून घेतले.याप्रकरणी   पतीविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    याबाबत माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील जोगे तांड येथील माहेर आलेल्या प्रतिभाबाई भोजू राठोड यांचा विवाह जळगाव  तालुक्यातील  भोजू बंद्री राठोड यांच्याशी ८ मे २०११ रोजी झाला आहे. दरम्यान लग्न झाल्यानंतर पती पत्नी हे दोन्ही जैन कंपनीत कामाला होत्या. त्यानंतर पती पत्नीचा कौटुंबिक वाद सुरू होता. हा वाद न्यायालयात पोहचल्याने प्रतिभाबाई ह्या २० मार्च २०१९ रोजी मुलाला घेवून माहेरी निघून गेल्या. प्रतिभाबाई यांनी केलेल्या कामांचा पगार त्यांच्या खात्यात जमा होता. दरम्यान पती भोजू बंद्री राठोड याने ७ एप्रिल २०२० ते ८ जुलै २०२० दरम्यान, पत्नीच्या नावाच्या बनावट सह्या करून त्यांच्या वेळोवेळी खात्यातून एकुण ६२ हजार ४०० रूपये काढून घेतले. विवाहिता माहेरहून पैसे काढण्यासाठी जैन कंपनीसमोर असलेल्या एका बँकेत आले असता त्यांच्या खात्यात पैसे नसल्याचे समोर आले. त्यांनी अधिक चौकशी केली असता त्यांचे पती भोजू राठोड याने त्यांच्या नावाच्या बनावट सह्याकरून परस्पर पैस काढल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी विवाहितेने मंगळवारी १४ डिसेंबर रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी भोजू राठोड याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोन अमोल मोरे करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    बनावट व्हिडिओचा स्फोट: झिरवाळ प्रकरणात ‘ब्लॅकमेल’चा धक्कादायक ट्विस्ट

    March 31, 2026

    शीतला माता मंदिरातील अपघात: भक्तगणांच्या गर्दीत धक्काबुक्की ; ९ जणांचा मृत्यू !

    March 31, 2026

    धक्कादायक : सप्तशृंगी पदयात्रेत काळाचा घाला; विजेच्या धक्क्याने १७ वर्षीय भाविकाचा मृत्यू

    March 31, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.