Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अल्पवयीन मुलाला फायटरने मारहाण !
    क्राईम

    अल्पवयीन मुलाला फायटरने मारहाण !

    editor deskBy editor deskDecember 30, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ : प्रतिनिधी 

    शहरातील गडकरी नगरात काही कारण नसताना एका अल्पवयीन मुलाला फायटरने नाकावर तोंडावर मारहाण करून जखमी केल्याची घटना २१ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता घडली होती. त्याच्यावर उपचार केल्यानंतर अखेर गुरुवारी २८ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात २ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरातील लाइफस्टाईल कॉलनी परीसारातीली अक्षय प्रदीप साबळे (वय-१७) हा मुलगा आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. २१ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता काही कारण नसताना संशयित आरोपी शौर्य शिवमोहन सिंग आणि अली फिरोज खान दोन्ही रा. जाम मोहल्ला, भुसावळ यांनी फायटरने नाकावर तोंडावर मारहाण करून गंभीर जखमी केले आणि दोघे फरार झाले. दरम्यान जखमी अवस्थेत असलेल्या अक्षय साबळे याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार केल्यानंतर अखेर गुरुवारी २८ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार संशयित आरोपी शौर्य शिवमोहन सिंग आणि अली फिरोज खान या दोघांविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक राजू सांगळे हे करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे जळगाव तालुका अध्यक्षपदी सुमित पाटील व उपाध्यक्षपदी प्रविण पाटील यांची नियुक्ती

    February 5, 2026

    खळबळजनक : अज्ञात महिलेचा खून करून मृतदेह जाळल्याचा संशय !

    February 5, 2026

    दोन दुचाकीची जबर धडक : दोन तरुण जागीच ठार !

    February 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.