Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » कंपनीतून का काढले म्हणत एकाला मारहाण !
    क्राईम

    कंपनीतून का काढले म्हणत एकाला मारहाण !

    editor deskBy editor deskOctober 29, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    कंपनीतून काढल्याचा राग आल्याने यशवंत रामकृष्ण महाजन ( वय ६४, रा. संतोषनगर, जळगाव) हे दुचाकीने घरी जात असताना त्यांना प्रमोद नामदेव पाटील (वय ३५, रा. नशिराबाद) यांने बांबूने मारहाण केली. या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील संतोषनगरात यशवंत रामकृष्ण महाजन हे वास्तव्यास असून ते एका कंपनीत अधिकारी म्हणून नियुक्त आहेत. याच कंपनीत प्रमोद पाटील हा तरुण कामाला होता. त्याला कंपनीतून काढून टाकण्यात आल्याने हा राग त्याच्या मनात होता. कंपनीतील अधिकारी यशवंत रामकृष्ण महाजन हे दि. २६ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी दुचाकीन जळगाव येथे घरी परतत असताना नशिराबाद येथील उड्डाणपुलाजवळ प्रमोद हा बांबू घेऊन उभा होता. महाजन हे दिसताच त्याने चालू दुचाकीवर त्यांना बांबूने मारण्यास सुरुवात केली. तू मला कंपनीतून का काढले, का काढले, तुला जीवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. या मारहाणीत महाजन यांच्या खांद्याला, पायाला दुखापत होऊन ते जखमी झाले. या प्रकरणी महाजन यांनी नशिराबाद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ गजानन देशमुख करीत आहेत.

    #criem #jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    खळबळजनक : अज्ञात महिलेचा खून करून मृतदेह जाळल्याचा संशय !

    February 5, 2026

    दोन दुचाकीची जबर धडक : दोन तरुण जागीच ठार !

    February 5, 2026

    फिरायच्या बहाण्याने नेऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल !

    February 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.