जळगाव : प्रतिनिधी
शहरातील एका परिसरात एका २८ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना जळगाव उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील अयोध्या नगर परिसरातील विशाल तुकाराम चौधरी (वय-२८)हा तरुण गेल्या दोन महिन्यांपासून एमआयडीसीतील सुप्रीम कंपनीत कामाला होता. दि.२० रोजी शुक्रवारी रात्री ८ ते १० वाजेच्या दरम्यान गल्लीतील नवरात्रोत्सवाच्या कार्यक्रमात विशाल चौधरी याने सहभाग घेतला होता. मात्र यानंतर त्याने घरात कुणीही नसतांना किचन रूममध्ये दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. त्याची पत्नी हर्षाली या घरात आले असता पती विशाल चौधरी यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. गळफास घेतलेल्या अवस्थेत पतीचा मृतदेह पाहताच तीने एकच आक्रोश केला. हा आक्रोश पाहून शेजारी राहणाऱ्या नागरीक व तरूणांनी धाव घेवून विशालचा मृतदेह तातडीने खाली उतरवत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केलं असता वैद्यकीय अधिकारी डॉ. निरंजन देशमुख यांनी मयत घोषीत केले.
याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील प्राथमिक तपास पोहेकॉ सचिन मुंढे, पोहेकॉ आकाश परदेशी करत आहे. मयताच्या पश्चात आई सुषमा, वडील तुकाराम चौधरी, भाऊ चिराग, पत्नी हर्षाली आणि तीन वर्षाची मुलगी ऐशीका असा परिवार आहे. दरम्यान या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.