Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » २ हजारांच्या नोट बाबत बँकेची नवीन नियमावली जाहीर !
    राजकारण

    २ हजारांच्या नोट बाबत बँकेची नवीन नियमावली जाहीर !

    editor deskBy editor deskMay 21, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    दोन दिवसापूर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २ हजाराची नोट कालबाह्य केल्यानंतर देशातील अनेक नागरिकांना मोठा धक्का बसला होता. पण यात चार महिन्याची मुदत दिल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे तर आज पुन्हा एकदा स्टेट बँकेने मोठा निर्णय घेतला आहे.
    स्टेट बँकेने रविवारी 2000 च्या नोटा बदलण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या. भारतातील सर्वात मोठ्या बँकेने म्हटले आहे की, 2000 च्या नोटा बदलण्यासाठी कोणत्याही ओळखपत्राची आवश्यकता नाही. कोणताही फॉर्म भरण्याची गरज नाही. एका वेळी 10 नोटा बदलता येतील.

    नोटा बदलण्यासंबंधी सोशल मीडियावर वेगवेगळे दावे करण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर स्टेट बँकेने ही अधिसूचना जारी केली आहे. नोटा बदलून घेण्यासाठी आधारसारखा आयडी आवश्यक असेल व फॉर्मही भरावा लागेल, असे दावे सोशल मीडियावर करण्यात येत होते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 19 मे रोजी 2000 रुपयांच्या नोटा बंद करण्याची घोषणा केली होती. आरबीआयने 30 सप्टेंबरपर्यंत बँकांमध्ये अशा नोटा बदलून घेण्यास किंवा खात्यात जमा करण्यास सांगितले आहे. या नोटा त्यानंतरही कायदेशीर राहतील, असे बँकेने स्पष्ट केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    बीडमध्ये धक्कादायक प्रकार; सावत्र मुलासोबत महिला फरार

    April 20, 2026

    भाजपचे एक ‘दोन फुटांचा’ नेता ; सुजात आंबेडकरांचा हल्लाबोल !

    April 20, 2026

    महिला आरक्षणावरून विरोधकांचा विश्वासघात; मुख्यमंत्री फडणवीसांचा घणाघात !

    April 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.