Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » गणपती विसर्जन ठरले काळाचा घाला; तलावात बुडून तरुणाचा मृत्यू!
    क्राईम

    गणपती विसर्जन ठरले काळाचा घाला; तलावात बुडून तरुणाचा मृत्यू!

    editor deskBy editor deskSeptember 28, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चाळीसगाव : प्रतिनिधी 

    तालुक्यातील करगाव गावाजवळ आश्रम शाळेच्या मागे गांव पांढरी शिवारातील तलावात गणपती विसर्जन करतेवेळी पाण्यात बुडून करगाव तांडा नंबर २ मधील ३० वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना दि. २६ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली आहे. चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार करगाव तांडा २ मधील ३० वर्षीय तरुण अनिल बुधा कुऱ्हाडे हा तरुण दि.२६ रोजी गांव पांढरी शिवारातील तलावात गणपती विसर्जनासाठी गेला होता. त्यावेळी तो पाण्यात बुडाल्याने चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे सपोनि विजय माळी, एएसआय युवराज माळी, हवालदार प्रवीण सपकाळे, संदीप पाटील, पो.कॉ. बाविस्कर यांनी घटनास्थळी धाव घेवून ग्रामस्थांच्या मदतीने अनिल कुऱ्हाडेचा मृतदेह काढण्यात आला. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास सुरु आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    माकडाच्या उडीने महिला गंभीर जखमी; उपचारादरम्यान मृत्यू!

    September 28, 2026

    प्रताप महाविद्यालयाच्या उड्डाणपुलावर काळाचा घाला; विजय भार्गव यांचा अपघाती मृत्यू!

    September 28, 2026

    मनाला नवचैतन्य देणारे ‘Sunrise & Surrender’..

    September 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.