Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » तलवार घेत दहशत माजविणाऱ्यास एमआयडीसी पोलिसांनी घेतले ताब्यात !
    क्राईम

    तलवार घेत दहशत माजविणाऱ्यास एमआयडीसी पोलिसांनी घेतले ताब्यात !

    editor deskBy editor deskMarch 15, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    जळगाव शहरातील एका परिसरातील २२ वर्षीय तरूण जळगाव जिल्ह्यातून हद्दपार असतांना देखील हातात तलवार घेऊन दहशत सुप्रिम कॉलनीतील रामदेवबाबा मंदिराजवळ माजविणाऱ्या दिनकर ऊर्फ पिण्या रोहिदास चव्हाण (वय २२, रा. सुप्रिम कॉलनी) याला एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास बेड्या ठोकल्या. त्याच्यावर कारवाई करून तलवार जप्त करण्यात आली आहे. दिनकर चव्हाण याला जळगाव जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. मात्र, तरीही तो सुप्रिम कॉलनीतील रामदेवबाबा मंदिराजवळ तलवार घेऊन फिरत होता.

    यांनी केली कारवाई !
    एमआयडीसी पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या माहितीच्या आधारे पोलिस उप निरीक्षक आनंदसिंग पाटील, पोहेकॉ गणेश शिरसाळे, पोलिस नाईक विकास सातदिवे, किशोर पाटील, योगेश बारी, पो. कॉ. किरण पाटील, नाना तायडे आदींना पुढील तपास आणि कारवाईकामी रवाना केले. तपास व शोध पथकाने दिनकर चव्हाण यास तलवारीसह ताब्यात घेत अटक केली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    शेतात पेरणी सुरू अन् क्षणात होत्याचं नव्हतं; विजेच्या तडाख्यात २१ वर्षीय तरुण ठार

    June 30, 2026

    चिंचोलीत भरधाव ट्रकची दुचाकीला भीषण धडक; ३७ वर्षीय तरुण ठार

    June 30, 2026

    गिरणा नदीपात्रातून मंदिरात शिरले; एकवीरा मातेची दानपेटी फोडून ५५ हजारांवर डल्ला

    June 30, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.