Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » प्रेयसीने दिले गिफ्ट फोडले ; पतीने पत्नीच्या डोक्यात मारला रॉड !
    क्राईम

    प्रेयसीने दिले गिफ्ट फोडले ; पतीने पत्नीच्या डोक्यात मारला रॉड !

    editor deskBy editor deskMarch 14, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    जळगाव शहरातील एका तरुणाला प्रेयसीने घड्याळ गिफ्ट दिल्याची कुणकुण तरुणाच्या पतीला लागल्याने तिने हे घड्याळ फोडले असता पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून जखमी केल्याची घटना शनिवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीत घडली. याप्रकरणी रविवारी पत्नीच्या तक्रारीवरून पतीविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

    पतीचे विवाहबाह्य संबंध आहेत, म्हणून जखमी महिला ही माहेरी निघून गेली होती. शनिवारी सायंकाळी ६ वाजता महिला ही सासरी परतली. तेव्हा पतीला त्याच्या प्रेयसीने दिलेली घड्याळ या महिलेला घरामध्ये दिसले. ही घड्याळ तिने फोडली. हा प्रकार पतीच्या लक्षात आल्याने त्याने महिलेला चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर घरातील लोखंडी रॉड डोक्यात मारला. यात महिला गंभीर जखमी झाली. उपचार घेतल्यानंतर महिलेने रविवारी एमआयडीसी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    फैजपूर-वरणगावमध्ये गोडाऊन फोडून सिलेंडर चोरी करणारी टोळी उघड; लाखोंचा मुद्देमाल जप्त!

    April 29, 2026

    धरणगाव तालुक्यात क्रूझर उलटून नववधूसह तिघांचा जागीच मृत्यू, सहा जखमी

    April 29, 2026

    पहाटेचा थरार : कारमधून आलेल्या चोरट्यांची धाड; दोन दुकानं फोडून पोलिसांना चकवा !

    April 29, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.