Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भडगावमध्ये खाकी वर्दीवर हल्ला : पोलिसांना शिवीगाळ अन् मारहाण; चौघांना अटक !
    क्राईम

    भडगावमध्ये खाकी वर्दीवर हल्ला : पोलिसांना शिवीगाळ अन् मारहाण; चौघांना अटक !

    editor deskBy editor deskNovember 25, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भडगाव : प्रतिनिधी 

    शहरात रात्रगस्तीवर असलेल्या पोलिसांवर जमावाने हल्ला केल्याची घटना घडली असून, या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. या सर्व संशयितांना न्यायालयाने एक दिवसाची न्यायालयीन कस्टडी सुनावली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार,  येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील चहाच्या टपरीसमोर २२ नोव्हेंबरला रात्री ९ वाजेच्या सुमारास गर्दी व आरडाओरड सुरू असल्याचे पाहून रात्रगस्तीवर असलेल्या फिर्यादी ललित किशोर पाटील, पो.कॉ. संदीप परदेशी, पो. कॉ. लहु कोळी हे थांबले. तेथे सचिन ज्ञानेश्वर मोरे व स्वप्निल गजानन सोनवणे यांना शिवीगाळ करत मारहाण सुरू होती. संशयित सद्दाम ऊर्फ रईस अब्दुल हमीद याने लोखंडी फायटरने, तर दिनेश ऊर्फ बबलू प्रल्हाद पवार याने काठीने मारहाण करत होता. तर, हे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाच सद्दाम ऊर्फ रईस अब्दुल हमीद, दिनेश ऊर्फ बबलू प्रल्हाद पवार, वसीम जाकीर शेख आणि अश्फाक अल्ताफ (सर्व रा. भडगाव) यांनी शिवीगाळ करून मारहाण केली. सद्दामने ललिता पाटील यांचा गळा दाबून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.

    जखमी ललित पाटील यांनी भडगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी व मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. सर्व आरोपींना भडगाव न्यालयात हजर केले असता सर्वांना एक दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तपास पो.नि. महेश टाक यांच्या मार्गदर्शनात पो. उ.नि. सुशील सोनवणे, हवलादार सचिन वाबळे, ज्ञानेश्वर पाटील, नीलेश ब्राह्मणकर, प्रवीण परदेशी, दीपक पाटील, जितेंद्र राजपूत, प्रदिप परदेशी, महिला पोलीस सोनी सपकाळे तपास करत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगावातील रथोत्सवाच्या उत्साहावर चोरीचे विरजण : गर्दीत चोरट्यांनी पाच महिलांना केले लक्ष्य!

    November 25, 2026

    सात साक्षीदारांच्या साक्षी ठरल्या महत्त्वपूर्ण : पोक्सो प्रकरणात आरोपीला ३ वर्षांचा कारावास!

    November 25, 2026

    मुलीची भेट ठरली अखेरचीच : दुचाकी अपघातात ५२ वर्षीय शेतकऱ्याचा अंत!

    November 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.