Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » सात साक्षीदारांच्या साक्षी ठरल्या महत्त्वपूर्ण : पोक्सो प्रकरणात आरोपीला ३ वर्षांचा कारावास!
    क्राईम

    सात साक्षीदारांच्या साक्षी ठरल्या महत्त्वपूर्ण : पोक्सो प्रकरणात आरोपीला ३ वर्षांचा कारावास!

    editor deskBy editor deskNovember 25, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    अल्पवयीन मुलीला धमकी देवून तिला पळवून नेणाऱ्या प्रवीण सलतान चव्हाण (वय २२, रा. करगाव तांडा, ता. चाळीसगाव) याला न्यायालयाने पोक्सोतंर्गत गुन्ह्यात दोषी ठरवित ३ वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली. हा निकाल दि. २४ रोजी अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश पी.पी. बनकर यांच्या न्यायालयाने सुनावली.

    मिळालेल्या माहितीनुसार,  दुकानात कुरकुरे आणण्याकरीता गेलेल्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला दुचाकीवरुन आलेल्या दोघत्तंनी तू माझ्यासोबत चल, नाही तर तुला चाकूने मारुन टाकेल अशी धमकी दिली. त्यामुळे घाबरलेली मुलीला जबरदस्तीने घेवून जात तिचे अपहरण केले होते. याप्रकरणी दि. २७ मे २०१९ रोजी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोघे जण पीडितेला धुळे रस्त्यावरील डेराबर्डी येथील एका हॉटेलच्या मागे घेवून गेल्यानंतर त्याठिकाणी त्यांचा तिसरा जोडीदार तेथे होता. दरम्यान, प्रवीण चव्हाण याने पीडितेचा हात पकडून माझ्यासोबत लग्न कर नाही तर समाजात तुझी बदनामी करेल अशी धमकी दिली. त्यावेळी पीडितेचे मेहुणे त्याठिकाणी पोहचल्यामुळे पुढील अनर्थ टळला आणि ते पीडितेला सोबत घेवून घेवून गेले.

    याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसात पोक्सोतंर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर तत्काली सहा. पोलीस निरीक्षक आशिष रोही यांनी न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. या खटल्याचे कामकाज अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश पी.पी.बनकर यांच्या न्यायालयात चालले. सरकारपक्षातर्फे सात साक्षीदार तपासण्यात आले असून यामध्ये पीडितेसह तिच्या वडीलांची साक्ष महत्वपुर्ण ठरली.

    न्यायालयाने सरकार पक्षातर्फे अति. शासकीय अभियोक्ता व विशेष सरकारी वकील चारुलता बोरसे यांचा युक्तीवाद ग्राह्य धरीत प्रवीण सलतान चव्हाण याला दोषी ठरवित तीन वर्ष सश्रम कारावास आणि १० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास दोन महिने कारावास व भादवी कलम ३६३ अन्वये १ वर्श कारावास व २ हजार रुपयं दंड तसेच न भरल्यास १५ दिवसांची तर कलम ५०६ अन्वये एक वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली. पैरवी अधिकारी म्हणून अमोल पाटील, केसवॉच दीपक सत्रे यांनी सहकार्य केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    आधी डोक्यात लोखंडी पाईप मारला, नंतर गोणीत भरून मृतदेह नदीत फेकला : पाचोरा पोलिसांचा मोठा तपास!

    November 25, 2026

    जळगावातील रथोत्सवाच्या उत्साहावर चोरीचे विरजण : गर्दीत चोरट्यांनी पाच महिलांना केले लक्ष्य!

    November 25, 2026

    मुलीची भेट ठरली अखेरचीच : दुचाकी अपघातात ५२ वर्षीय शेतकऱ्याचा अंत!

    November 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.