Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मोठी बातमी : प्रजासत्ताक दिनी घेतली ग्रामसेवकाने लाच ; पोलिसांनी केली अटक !
    Uncategorized

    मोठी बातमी : प्रजासत्ताक दिनी घेतली ग्रामसेवकाने लाच ; पोलिसांनी केली अटक !

    editor deskBy editor deskJanuary 26, 2023Updated:January 26, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    धरणगाव तालुक्यातील गारखेडा व बाभळे ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या विविध योजनांच्या कामाचे झालेले लेखापरीक्षण बाबतची माहिती तक्रारदाराने माहिती अधिकारातंर्गत ग्रामसेवकाकडे मागितली. ही माहिती देण्याच्या मोबदल्याच अडीच हजारांची लाच घेणाऱ्या ग्रामसेवकाला जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे. २६ जानेवारीला लाच घेतांना ग्रामसेवकाला अनिल नारायण गायकवाड, वय – ५० असे अटक करण्यात आली आहे. या कारवाईने खळबळ उडाली आहे.

    धरणगाव तालुक्यातील गारखेडा येथील तक्रारदार ४९ वर्षीय रहीवासी असून त्यांनी गारखेडा व बाभळे ग्रुप ग्रामपंचायतीमधील सन २०१५ ते २०२० या कालावधी दरम्यान ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या विविध योजनांच्या कामाचे झालेले लेखापरीक्षण बाबतची माहिती माहितीच्या अधिकाराचा अर्ज करून ग्रामसेवक अनिल गायकवाड यांच्याकडे मागितली होती. सदरची माहिती ही वेळेत न मिळाली नाही. ही सविस्तर माहिती देण्याच्या मोबदल्यात ग्रामसेवक यांनी तक्रारदाराकडे तीन हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती ही रक्कम अडीच हजार रुपये एवढी ठरली होती. याबाबत तक्रारदार यांनी जळगाव लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारीनुसार पथकाने प्रजासत्ताकदिनी सापळा रचून धरणगाव अमळनेर रोडवरील सिंधु ढाबा येथे तक्रारदाराकडून अडीच हजारांची लाच घेतांना ग्रामसेवक अनिल गायकवाड यास रंगेहाथ अटक केली. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    यांनी केली कारवाई
    पोलीस उपअधीक्षक शशीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरक्षिक संजोग बच्छाव, पोलीस निरिक्षक एन. एन. जाधव, बाळू मराठे, ईश्वर धनगर, सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, सुनील पाटील, रविंद्र घुगे, महिला पोलीस कॉन्स्टेबल शैला धनगर, जनार्दन चौधरी,किशोर महाजन, सुनील वानखेडे, राकेश दुसाने, प्रणेश ठाकूर, अमोल सुर्यवंशी यांच्या पथकाने ही कारवाई केली..

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    रेशन धान्याच्या कथित काळाबाजाराचे जाळे जिल्हाभर?

    September 10, 2026

    जळगाव रेल्वे स्थानकाच्या शिवाजीनगर बाजूस नूतनीकृत तिकीट खिडकीची सुविधा सुरू

    August 28, 2026

    अमळनेर हादरले : एकाच परिवारातील चौघांनी पहाटेच्या सोबत घेतली रेल्वे खाली उडी !

    August 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.