Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » तरुण म्हणाला ‘तु माझी फेवरेट’ महिला पळत….
    क्राईम

    तरुण म्हणाला ‘तु माझी फेवरेट’ महिला पळत….

    editor deskBy editor deskJanuary 21, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पुणे : वृत्तसंस्था 

    पुण्याला शिक्षणाचे माहेरघर म्हटले जाते पण गेल्या काही दिवसापासून असे काही घडत आहे. गुन्हेगारीचे प्रमाण व प्रेम प्रकरण ज्या मोठ्या प्रमाणात बाहेर येत असल्याने शहराची ओळख पुसत चालली का असा प्रश्न निर्माण होत आहे. अशीच एका धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे.

    ‘ तू जेव्हा कॉलेजमध्ये होती तेव्हापासून माझी फेवरेट होती आणि मला तू खूप आवडायची ‘ असे म्हणत एका तरुणाने महिलेसोबत गैरवर्तन केलेले आहे. सोमवारी ९ तारखेला दुपारी हा प्रकार घडलेला असून तळेगाव दाभाडे पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकलेल्या आहेत.

    मिळालेल्या माहिती नुसार तळेगाव दाभाडे येथील २४ वर्षीय तरून मोहन गंगाधर साळवे याला अटक करण्यात आलेली आहे. पीडित महिलेने तळेगाव दाभाडे पोलिसात त्याच्या विरोधात फिर्याद दिलेली आहे. फिर्यादी महिला यांचे यशवंत नगर परिसरात किराणा मालाचे दुकान असून त्यांच्या दुकानात मोहन हा अनेकदा यायचा त्यावेळी त्याने फिर्यादी महिला यांना जेव्हापासून तू कॉलेजमध्ये होती तेव्हापासून तू माझी फेवरेट होती आणि मला तू खूप आवडायची असे म्हणत त्यांच्यासोबत गैरवर्तन केले. फिर्यादी घाबरून तिथून पळाल्या त्यानंतर आरोपीने त्यांचा पाठलाग केला आणि याबाबत जर कुणाला सांगितले तर तुला जिवंत ठेवणार नाही अशी देखील धमकी दिली मात्र पीडित महिलेने पोलिसात धाव घेत आरोपीच्या विरोधात तक्रार दिलेली असून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ज्याला लेकरासारखं प्रेम दिलं, त्याच भाच्याने मावशीचा जीव घेतला! ४० दिवसांनी समोर आलं काळीज पिळवटणारं सत्य”

    September 13, 2026

    कर्की फाट्यावर अपूर्ण पुलामुळे सर्व्हिस रोडवर खड्ड्यांचे साम्राज्य; गणेशमूर्ती नेताना भक्तांना तारेवरची कसरत !

    September 13, 2026

    रिचार्ज अपडेट करताना बँक खात्यावर डल्ला; वृद्धाचे तब्बल १० लाख लंपास

    September 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.