जळगाव शहरात पुन्हा एकदा वाळू माफ यांचा हैदोस सुरू झालेला आहे रात्रीच्या सुमारास जळगाव भुसावळ महामार्गावर निवासी जिल्हाधिकारी गस्तीवर असताना त्यांना अनोळखी वाळूमाफेंनी त्यांच्या चारचाकी शासकीय गाडीवर हल्ला केला आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार जळगाव भुसावल महामार्गावर रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात अवैध वाळूमाफिया सुरू असते याची माहिती निवासी जिल्हाधिकारी सोपान कासार यांना मिळाली असता त्यांनी लागलीच या परिसरात गस्तीवर गेले असता अनोळखी वाळू माफियांनी त्यांच्या शासकीय गाडीची तोडफोड करीत त्यांच्यावर देखील हल्ला केला आहे. या घटनेत निवासी जिल्हाधिकारी सोपान कासार हे जखमी झाले असून घटनास्थळी पोलीस पथक दाखल झाले आहे. या घटनेची माहिती महसूल व पोलीस विभागात मोठी खळबळ उडाली होती.…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
जळगाव : प्रतिनिधी समाज कल्याण विभागाच्या वतीने अमळनेर येथे उभारण्यात आलेल्या १०० विद्यार्थी क्षमतेच्या मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतीगृह इमारतीचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ४ फेब्रुवारी २०२४ रोजी होत आहे. दुपारी २:३० वाजता संपन्न होणार या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, श्री अजित दादा पवार , ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील ,आपत्ती व्यवस्थापन व मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, समाज कल्याण आयुक्त ओम प्रकाश बकोरिया, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी श्री.अंकित , मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रशांत औटी, समाज कल्याण नाशिक…
धरणगाव -अमृत 2.0 अंतर्गत धरणगाव शहरासाठी आपण वाढीव पाणी पुरवठा योजना सदर योजने अंतर्गत प्रस्तावित केली होती. शहरासाठी 44 कोटी रुपयांची वाढीव पाणी पुरवठा योजनेचे. राज्य शासनाचे. राज्य स्तरीय तांत्रिक समिती कडे सादरीकरण करण्यात आले होते त्यास. मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. धरणगाव शहराला नियमित आणि पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा वर्षाचे 365 दिवस व्हावा यासाठी पालकमंत्री तथा कॅबिनेट मंत्री पाणी पुरवठा व स्वचछता गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नाने पाणी पुरवठा वितरण प्रणालीचे काम सुरू होते. लवकरच शहराला नियमित पाणी पुरवठा होणार होता.परंतु शहराचा पाण्याचा स्त्रोत तापी नदीवर धावडा येथून आहे, तेथील पाइप लाईन ही जुनी झाल्याने वारंवार लिकेज् होत असते. म्हणून…
जळगाव तालुक्यातील वारकरी भजनी मंडळांना झाले साहित्याचे वाटप जळगाव प्रतिनिधी दि. ०१ – सांस्कृतिक व धार्मिक परंपरा टिकून ठेवण्यासाठी भजनी साहित्य वाटप केले जात आहे. जीवनाची वाट सुकर होण्यासाठी वारकरी संप्रदायाचे विचार समाजाला तारू शकतो. वारकरी संप्रदायाने सनातन संस्कृती टिकवली असून गावा – गावात संप्रदाय वाढवाला आहे. असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. वडली येथील भाऊसो गुलाबरावजी पाटील माध्यमिक विद्यालयात दुसऱ्या टप्यातील भजनी साहित्य वितरणाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाचे सूक्ष्म नियोजन जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील व मित्र परिवाराने केले होते. या अत्यंत शिस्तबद्ध व अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. सकाळी…
जळगाव जिल्हा पोलिस अधिक्षक एम. राजकुमार यांची बदली झाली असून त्यांच्या जागी एम. सी. व्ही. महेश्वर रेड्डी येत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या होत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जळगावचे पोलिस अधिक्षक एम. राजकुमार यांची बदली झाली आहे.एम. राजकुमार यांची सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षकपदी बदली झाली असून त्यांच्या जागी मुंबई येथील पोलीस उपायुक्तपदी असलेले एम.सी.व्ही. महेश्वर रेड्डी येत आहेत. राज्य शासनाचे मुख्य सहसचिव व्यंकटेश भट यांनी तसे आदेश काढले आहेत.
जळगाव – मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी जळगाव गुन्हे शाखेचे निलंबित निरीक्षक किरणकुमार बकाले हे गेल्या दिड वर्षांपासून फरार होते. पोलिसांकडून शोध सुरू असतानाही ते सापडत नसल्याने पोलिस यंत्रणेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता. मात्र आज अचानक सकाळी किरणकुमार बकाले हे स्वतःहून पोलिस अधीक्षक कार्यालयात शरण आले. मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी विनोद देशमुख यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात एलसीबीचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होता. तेव्हापासून बकाले हे फरार होते. पोलीस प्रशासनाने ही बकाले यांना निलंबित करून नाशिक येथे हजर होण्यास सांगण्यात आले होते. मात्र, हजर न होता त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला मात्र,…
चाळीसगाव प्रतिनिधी । क्रिकेट स्पर्धेच्या झालेल्या वादातून मुंबई पोलीस दलात कर्मचारी असलेल्या तरूणाचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार शहरातील पीर मुसा कादरी दर्गा परिसरात घडला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या गुन्ह्यात चार जणांना संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे. शुभम अर्जुन आगोणे (वय-२८ रा. चाळीसगाव) असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे. चाळीसगाव पीर मुसा कादरी बाबा दर्गा जवळ पाटणादेवी नाक्याजवळ रविवारी १२ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास शुभम आगोणे या तरुणावर काही जणांनी धारदार शस्त्राने वार करीत हल्ला केला. घटनेत शुभम गंभीर जखमी झाल्याने त्याला खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असता उपचार…
बांधकाम मटेरीयलची वाहतूक करणाऱ्या व्यावसायीकाचा डंपर अडवून 30 हजारांची लाच मागून ती खाजगी पंटराच्या माध्यमातनू स्वीकारताना अमळनेर पोलिस ठाण्यातील हवालदारासह खाजगी पंटराला धुळे एसीबीने रंगेहाथ अटक केल्याने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. हवालदार घनश्याम अशोक पवार व खाजगी पंटर इम्रानखान शब्बीरखान पठाण असे अटकेतील लाचखोरांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 30 हजारांची लाच भोवली तक्रारदार हे अमळनेर शहरातील रहिवासी असून त्यांचा बांधकाम मटेरीयलचा व्यवसाय आहे. अमळनेरचे हवालदार घनश्याम पवार यांनी 7 जानेवारी तक्रारदार यांचा डंपर अडवत त्यांच्याकडे पोलिस निरीक्षक विजय शिंदे व स्वतःसाठी दरमहा हप्ता म्हणून 30 हजारांची लाच मागितली व त्याबाबतची तक्रार तक्रारदाराने धुळे एसीबीकडे दूरध्वनीवरून केली. धुळे एसीबीने…
जळगाव : धरणगाव येथील धरणगाव जळगाव रस्त्यावरील प्रवेशद्वारचे काम पूर्ण झाले असून हे प्रवेशद्वार उद्या दुपारपासून या वाहतुकीसाठी खुले केले जाणार आहे. या प्रवेशद्वाराची पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज पाहणी केली आहे.धरणगाव येथील जळगाव रस्त्यावर भव्य स्वागत प्रवेशद्वार उभारण्यात आलेले आहे. या प्रवेशद्वाराचे काम पूर्ण झाले असून या प्रवेशद्वाराची पाहणी आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली प्रवेशद्वाराचे काम उत्कृष्ट झाले असल्याचे त्यांनी समाधान व्यक्त केले. हे प्रवेशद्वार वाहतुकीसाठी उद्या खुले करण्यात यावे असे पालकमंत्री यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना सूचना दिल्या. त्यानुसार सोमवार (उद्या) दि ८ रोजी दुपारपासून हे प्रवेशद्वार खुले केले जाणार आहे. या भव्य प्रवेशद्वारामुळे धरणगाव शहरातील सौंदर्यात भर पडणार…
मराठा सर्वेक्षण कामकाजात जिल्हाधिकारी स्वतः सहभागी जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज स्वतः धरणगाव तालुक्यातील मुसळी गावातील मराठा कुटुंबास भेट देऊन प्रश्नावली भरून घेत संवाद साधला. राज्य मागासवर्ग आयोगाने जिल्हा प्रशासनाला घरोघरी जाऊन मराठा कुटुंबाचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जळगाव जिल्ह्यात सर्वेक्षणास सुरूवात झाली आहे. याप्रसंगी मराठा – कुणबी शोध मोहीमेचे जिल्ह्याचे नोडल अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, धरणगाव तहसीलदार महेंद्र सुर्यवंशी आदी उपस्थित होते. सर्वेक्षणासाठी शासनाकडून प्राप्त प्रश्नावलीनुसार मराठा कुटुंबाशी संवाद साधत सर्वेक्षण करून घेण्यात आले. जिल्हा व तालुकास्तरावर सर्वेक्षणात सहभागी होणाऱ्या शासकीय अधिकारी – कर्मचाऱ्यांनी मराठा कुटुंबाचे सर्वेक्षण करतांना कोण-कोणत्या गोष्टींचा समावेश केला पाहिजे तसेच आस्थेवाईकपणे…

