जळगाव प्रतिनिधी । शहरातील पिंप्राळ्यात काही एक कारण नसतांना प्रौढाला तीन जणांनी शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पिंप्राळ्यात महाराणा प्रताप चौकात भरतसिंग नरसिंग पाटील वय ४० हे राहतात. ते मंगळवारी सायंकाळी ८ वाजेच्या सुमारास पिंप्राळ्यातील शिवाजी चौकात असतांना काही एक कारण नसतांना त्यांना तीन अनोळखी व्यक्तींनी शिवीगाळ करत चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. यात एका मुलाने रस्त्यावर पडलेला दगड भरतसिंग यांच्या गालावर मारुन दुखातप केली. अशा आशयाच्या भरतसिंग पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरुन रामानंदनगर पोलिसात तीन अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
यावल-प्रतिनिधी ।शेतजमिनीचा वाद असलेला दाखल दाव्याच्या निकालाची नक्कम देण्यासाठी शासकीय फीच्या व्यतिरिक्त पाचशे रूपयांची लाच घेणाऱ्या तहसील कार्यालयातील कोषागार अव्वल कारकूनला लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे यावल तहसील कार्यालयात खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, यावल तालुक्यातील मोहराळे शिवारात तक्रारदार यांच्या वडीलांच्या नावे शेतजमीन आहे. शेतजमिनीचे खरेदी-विक्री व्यवहाराबाबत वाद-विवाद होते. त्यामुळे याचा दावा यावल तहसील कार्यालयात दाखल केला गेला होता. सदर दाखल केलेल्या दाव्यामधील तहसीलदारांनी दिलेल्या निकालाच्या दस्तऐवजांच्या नकला देण्याच्या मोबदल्यात शासकीय फि व्यतिरीक्त तक्रारदार यांचेकडे आलोसे यांनी पंचासमक्ष लोकसेवक कोषागार विभागातील अव्वल कारकून मुक्तार फकीरा तडवी (वय-५६) रा. लोकश नगर यावल याने ५०० रूपयांची लाच…
जळगाव प्रतिनिधी प्रविण पाटील । जळके शिवारात शेतातील शेततळ्यातील चक्क ११०० चौरस मीटर एवढा ६५ हजार रुपये किंमतीचा प्लास्टिक पेपर चोरट्यांनी लांबविल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील जळके गावातील रहिवासी प्रशांत अशोक पाटील वय ४० यांची जळके शिवारात शेती आहे. या शेतीत त्यांनी शेततळे उभारले असून त्यात ५० मायक्रॉन जाडीचा , ११०० रुपये चौरस मीटर लांबीचा पेपर शेततळ्यात टाकलेला होता. मंगळवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास शेतकरी प्रशांत पाटील हे शेतात आले असता, त्यांना शेततळ्यातील प्लास्टिकचा पेपर दिसून आला नाही. सर्वत्र परिसरात शोध घेवूनही प्लास्टिकचा पेपर मिळून आला…
जळगाव प्रतिनिधी प्रविण पाटील : जिल्ह्यातील कानळदा येथील जिल्हा परिषद शाळेत बुधवार १५ जून रोजी सकाळी ८ वाजता विद्यार्थ्यांची बैलगाडीवरून गावातून मिरवणूक काढून औक्षण करत अनोख्या पध्दतीने प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांची प्रमुख उपस्थिती होती. बुधवार १५ जून पासून नवीन शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होत असून विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवस आहे. जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळा सुरू झाल्या. कोरोनामुळे दोन वर्षांपासून बंद असलेल्या शाळा आज पूर्ण क्षमतेने पहिल्याप्रमाणेच सुरू झाल्याने विद्यार्थी आनंदाने भरावले होते. या अनुषंगाने कानळदा गावातील शाळेच्या अनोख्या पध्दतीने प्रवेशोत्सवा साजरा करण्यात आला. यावेळी शाळेच्या परिसरात रांगोळी टाकून तसेच विद्यार्थ्यांना…
जळगाव, प्रतिनिधी । जिल्हा रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात नव्यान ६ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. जिल्ह्यात सध्या १६ कोरोना रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी दिली आहे. जळगाव जिल्ह्यात सध्या १६ कोरोना बाधित रूग्ण उपचार घेत आहे. आज नव्याने ६ कोराना रूग्ण आढळून आले आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यात कोरोना जवळपास आटोक्यात आला होता. आता कोरोनाची नव्या लाटेत रूग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. आज भुसावळ तालुक्यातून -३, चोपडा तालुका-१, यावल -२, असे एकुण ६ कोराना बाधित रूग्ण आढळून आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १ लाख…
जळगाव प्रतिनिधी । शहरातील दुरदर्शन टॉवरजवळ रस्ता क्रॉस करणाऱ्या निलगायने भरधाव रिक्षाला जोरदार धडक दिली. यात रिक्षा पटली होवून एक जण जागीच ठार झाला तर चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली. जखमींना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. साबीर सत्तार बागवान (वय-४०) रा. जाम मोहल्ला, भुसावळ असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, भुसावळकडून जळगावकडे येणारी रिक्षा क्रमांक (एमएच १९ व्ही ९५२१) येत असतांना दुरदर्शन टॉवरजवळ राष्ट्रीय महामार्गावरून निलगाय रस्ता क्रॉस करत असतांना रिक्षाला जोरदार धडक दिली. यात रिक्षा पटली झाली यात रिक्षात बसलेला शाबीर सत्तार बागवान याला डोक्याला मार…
जळगाव प्रविण पाटील । जळगाव तालुक्यातील जळके येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी जगन्नाथ पाटील तर व्हाईस चेअरमनपदी सुमित्राबाई चव्हाण करीत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील जळके येथील विकासोची पंचवार्षिक निवडणूकीनंतन मंगळवारी ७ जून रोजी सकाळी चेअरमन व व्हाइस चेअरमन पदासाठी निवडणूक विकासो कार्यालयात सहाय्यक सहकारी अधिकारी गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया राबविण्यात आली. यात चेअरमनपदी जगन्नाथ पाटील तर व्हाईस चेअरमनपदी सुमित्राबाई चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. याप्रसंगी नवनियुक्त संचालक जगन्नाथ पाटील, सुमित्राबाई चव्हाण, चंद्रशेखर पाटील, भागचंद जैन, अर्जुन पाटील, आधार पाटील, पंडित राखुंडे, आधार पटवळे, अशोक पाटील, इंदुबाई पाटील, ज्ञानेश्वर चव्हाण व ताराचंद पवार हे उपस्थित…
अध्यक्षपदी विरेंद्र एस. सोनकांबळे तर उपाध्यक्षपदी कांचन पी. वाणीधरणगाव (प्रतिनिधी ) – येथील धरणगाव तालुका तलाठी संघटनेची नव्याने कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असुन अध्यक्षपदी विरेंद्र एस. सोनकांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ३ रोजी नुकतीच दुपारी ४ वाजेच्या सुमारास प्रविण मधुकर बेंडाळे यांच्या अध्यक्षतेखाली धरणगाव तालुका तलाठी संघटनेच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली.. नवनियुक्त कार्यकारिणी खालीलप्रमाणे अध्यक्ष – विरेंद्र एस. सोनकांबळे, उपाध्यक्ष – श्रीमती कांचन पी. वाणी,सचिव- सचिन आर. कलोरे, कोषाध्यक्ष- राहूल एस ढेरंगे, सल्लागार- भरत आर. पारधी सह सल्लागार- अविनाश पी. पाटील संघटक-लक्ष्मीकांत व्ही. बाविस्कर महिला प्रतिनिधी- श्रीमती ज्योती के. लोखंडेसभासद – महेंद्र आर. वंजारी,अलताब एन पठाण,आरिफ एस. शेख,…
धरणगाव प्रतिनिधी । राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त लाईव्ह महाराष्ट्र न्यूजच्या विशेषांकाचे प्रकाशन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याहस्ते पाळधी येथील निवासस्थानी करण्यात आले. याप्रसंगी शहर प्रमुख तथा नगरसेवक राजेंद्र महाजन, गटनेते विनय (पप्पू भावे), मोतीआप्पा पाटील, मोहन महाजन, विलास महाजन, प्रशांत देशमुख, भैय्या महाजन, राहुल रोकडे, लाईव्ह महाराष्ट्र न्यूजचे संपादक गौरव पाटील, महाराष्ट्र न्यूजचे उपसंपादक प्रविण पाटील यांच्यासह आदी उपस्थित होते.
धरणगाव तालुक्यातील पाळधी गावचे साधारण कुटुंबातील शिवसैनिक ,प.स सदस्य ,आमदार ,जिल्हा प्रमुख , उपनेते , कॅबिनेट मंत्री पालकमंत्री असा प्रवास करणारे महाराष्ट्रातील एकमेव उदाहरण असलेले खान्देशची मुलुख मैदान तोफ गुलाबरावजी पाटील यांचा ५ जून हा जन्म दिवस असल्याने सर्वप्रथम त्यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा ! एका साधारण गरीब कुटुंबातून आलेला व्यक्ती कॅबिनेट मंत्री पदी थेट विराजमान होतो हे अनेकांना तोंडात बोटे घालणारा विषय जरी असला तरी आपल्या अंगीभूत असलेल्या हजरजबाबीपणा आणि सडेतोड उत्तर देण्याची लकब प्राप्त असलेल्या गुलाबरावांना कोणी त्यांच्या ध्येय पासून रोखू शकले नाहीत. त्यांनी अनेकांशी ,’पंगा’ , घेतला असेल पण तो त्यांचा शिवसैनिकी बाणा होता. राजकारणापलीकडे मैत्री जोपासणारा नेता…

