Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

जळगाव प्रतिनिधी : जळगाव शहरातील गेंदलाल मिल परिसरात असलेल्या मोकळ्या जागेवर एका 25 वर्षीय तरुणाचा चाकूने भोसकून खून केल्याचा धक्कादायक प्रकार दुपारी ३ वाजेच्या सुमारास उघडकीला आला आहे. या घटनेत पोलिसांनी तीन संशयित आरोपींना अटक केली आहे.रहीम शहा उर्फ रमा मोहम्मद शहा (वय-25) रा. गेंदालाल मिल भोंग्याजवळ जळगाव असे मृत तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रहीम शहा उर्फ रमा हा काही त्याच्या तीन मित्रांसोबत शाहूनगर येथील गेंदालाल मेलच्या भोंग्याजवळ एका रेल्वे पाठीच्या बाजूला झाडाखाली बसलेले होते. अज्ञात कारणाहून या ३ जणांनी त्यांच्या पोटाला चाकूने भोसकून खून केल्याचा धक्कादायक प्रकार ३ वाजेचा सुमारास उघडकीला आला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर…

Read More

धरणगाव प्रतिनिधी । तालुक्यातील निंभोरा येथे ग्रामपंचायतीच्या वतीने जिल्हा परिषद मराठी शाळेत वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्साहात पार पाडण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन धरणगाव पंचायत समितीचे माजी सभापती डी.ओ.पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी सरपंच महिला अरूणाबाई पाटील, माजी सरपंच चेतन पाटील, ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्य रोहिदास नाना, उपसरपंच मनोहर कोळी, ग्रामपंचाय सदस्य भिकुबाई कोळी यांच्यासह ग्रामपंचायतीचे सदस्य, ज्येष्ठ नागरीक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सार्वजनिक जागा, जिल्हा परिषदेची मराठी शाळेत वृक्षारोपण करण्यात आले.

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यात पक्षावर नियंत्रण मिळवण्याची धरपकड सुरू आहे. शिंदे गटाचा दावा आहे की खरी शिवसेना त्यांची आहे, शिवसेना पक्षाचे खासदार आणि आमदार त्यांच्या सोबत आहेत. त्यामुळे शिवसेना आणि त्याच्या चिन्हावर त्यांचा दावा आहे. या विरोधात शिवसेनेकडून केंद्रीय निवडणूक आयोगाला एक पत्र देण्यात आले आहे आणि या संदर्भात निकाल देण्याची मागणी केली आहे. ४ जुलै रोजी झालेल्या बहुमत चाचणीत शिंदे गटाच्या बाजूने ४० आमदारांनी मदतान केले. ७ जुलै रोजी ठाणे मनपातील ६७ पैकी ६६ नगरसेवक शिंदे गटात दाखल झाले. मुंबईनंतर ठाणे मनपा सर्वात मोठी आहे. इतक सर्व झाल्यानंतर १८ जुलै…

Read More

सर्व गावांना मिळणार फिल्टरचे पाणी; आ. सावकारे व मा. जि.प. सदस्य विश्‍वनाथ पाटलांचा यशस्वी पाठपुरावा भुसावळ प्रतिनिधी- राज्याचे तत्कालीन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री आ. गुलाबराव पाटील यांनी तालुक्यातील कुर्‍हे पानाचे तसेच महादेवमाळ; वराडसीम, जोगलखोरी; गोजोरे आणि मोंढाळे या सहा गावांसाठी जलजीवन मिशन योजनेच्या अंतर्गत तब्बल २३ कोटी रूपयांची पाणी पुरवठा योजना मंजूर केली असून याला तांत्रीक आणि प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य विश्‍वनाथ पाटील यांनी याच गावांना २००८ साली पाणी पुरवठा योजना मंजूर करून तेव्हापर्यंत भेडसावणारा पाण्याचा प्रश्‍न कायम निकाली काढला होता. आता १५ वर्षांनी हीच योजना अधिक अद्ययावत स्वरूपात आणि…

Read More

धरणगाव प्रतिनिधी । शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येत असलेल्या शौचालयाचे बांधकाम सुरू असल्याने नागरीकांची गैरसोय निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे शहरातील रस्ते खराब झाले असून दुरूस्ती करण्यात यावी या मागणीसाठी धरणगावातील सार्वजनिक बांधकाम विभागासमोर भाजपाचे ठिय्या आंदोलन करण्यात आले. धरणगाव शहरातील रामदेवजी बाबा नगर,गणेश ऑटो सर्व्हिस व टिळक तलाव येथील शौचालय दुरुस्तीसाठी अनेक दिवसांपासून बंद आहेत तसेच मोठा माळी वाडा ,धरणीनाला,पाताळ नगरी जवळील शौचालयाचे बांधकाम सुरू असल्यामुळे त्याही ठिकाणी शौचास जागा नाही त्यामुळे नागरीकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होऊन त्रास सहन करावा लागत आहे.आता तर पावसाळ्याचे दिवस असल्याने खूपच त्रास महिला व पुरुषांना होत असून उघड्यावर शौचास बसल्यामुळे रोगराई वाढून नागरीकांचे…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: गेल्या वर्षांपासुन धरणगाव सार्वजनिक बांधकाम विभागाने उड्डाण पुलापासून ते धरणी नाला पुलापर्यंत, शहरातील प्रमुख रस्त्याचे उद्घाटन होऊन काँक्रिटीकरणाचे व डिव्हाईडरची कामे सुरू करण्यात आली होती. मात्र सुरू असलेली कामे अर्धात थांबवून कामे बंद करण्यात आली व जे रस्ते तयार केलेत, त्या रस्त्यावरही मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे आजतागायत रस्त्यांचे कामे करण्यास धरणगाव बांधकाम उपविभाग असमर्थ ठरल्यामुळे माहिती अधिकार जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघ व संघटनांच्या वतीने दि.२३ जुलै, २०२२ शनिवार पासून उपोषणास बसणार आहेत. २३जुलै रोजी शहरातील गूड शेफर्ड इंग्लिश स्कूल, उड्डाण पूल, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, बस स्थानक, व्हाईट हाऊस, मटन मार्केट, पारोळा नाका, पाटील वखार, भूमी गार्डन…

Read More

धरणगाव प्रतिनिधी । तालुक्यातील अहिरे बुद्रुक येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सिताबाई सोनवणे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील अहिरे बुद्रुक येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठी नुकतेच ग्रामपंचायत कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी ग्रामसेवकाच्या अध्यक्षतेखाली उपसरपंचपदी सीताबाई सोनवणे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या सिताबाई सोनवणे याचा ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आली. याप्रसंगी सरपंच कृष्णा संदाशिव, नाना बळीराम पाटील यांच्यासह ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते.

Read More

मुक्ताईनगर प्रतिनिधी । मुसळधार पाऊस सुरू असल्याने तापी, पुर्णा नदीला पुर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे नदी काठच्या नागरीकांनी सतर्क राहण्याचे आवाहन मुक्ताईनगर पोलीसांनी केले आहे. मुक्ताईनगर पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व पोलीस पाटील, सरपंच, ग्रामसेवक, उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष , पोलिस मित्र तसेच पत्रकार बंधू व प्रतिष्ठित नागरिक यांना कळविण्यात येते की, सध्या संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये मुसळधार पाऊस सुरू असून आपल्या मुक्ताईनगर पोलीस स्टेशन हद्दीत देखील पावसाचा जोर कायम आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास तापी-पूर्णा नदीला पुर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. लहान, मोठे नाल्यांना मोठा पूर येण्याची शक्यता असून कृपया कोणीही मच्छीमारी करता अगर इतर कारणास्तव नदीपात्रा…

Read More

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील नशिराबाद येथील रस्त्यांची दयनिय अवस्था झाली असून तातडीने रस्त्यावरील डागडुजी करून उपाययोजना करावी अशी मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नशिराबाद नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना मंगळवारी १९ जुलै रोजी सकाळी देण्यात आले. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून नशिराबाद शहरात पडणाऱ्या पावसामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. शहरातील विकसित झालेल्या वाढीव वस्त्या, उपनगरातील रहिवाशांना यामुळे फारच त्रास सहन करावा लागत आहे. विविध समस्यांपैकी प्रामुख्याने भेडसावते, ती रस्त्यांची समस्या या उपनगरातील तसेच वाढीव वस्त्यांतील रस्ते कच्चे असल्याने, त्या ठिकाणी साधे खडीकरणही नसल्याने पावसाच्या पाण्यामुळे चिखल होत असून नागरिकांना ये-जा करणे त्रासदायक होत आहे. या रस्त्यांनी…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: यावल शिवारातील स्वामी जनार्दन मंदीराची दानपेटी फोडून ४ हजार ५०० रूपयांची चिल्लर अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सोमवारी १८ जुलै रोजी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहिती अशी की, यावल शिवारात श्री राष्ट्रसंत जनार्दन स्वामी ध्यान मंदीर आहे. या ठिकाणी अनेक भाविक मोठ्या संख्येने येत असतात. चेतन देवीदास निगडे (वय-३७) हा तरूण रोजी सकाळी आणि संध्याकाळी मंदीरातील साफसफाई करून पुजापाठ करतो. सोमवार १८ जुलै रोजी सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.३० वाजेच्या कालावधीत अज्ञात व्यक्तीने मंदीराची दानपेटीचे कुलूप तोडून ४ हजार ५०० रूपयांची चिल्लर चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे.…

Read More