Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

जळगाव (प्रतिनिधी ) ;- रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा, हे ब्रिद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खासदार शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून ‘राष्ट्रवादी वैद्यकीय सहाय्यता कक्ष’ सुरु करण्यात येत आहे. विविध शासकीय वैद्यकीय योजना तसेच दानशूर सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून आर्थिक अडचणीतील गरजू रुग्णांना व अंपगांना मदत मिळवून देण्याचे काम या कक्षाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. आर्थिक अडचणीमुळे कोणत्याही रुग्णाचे उपचार थांबू नयेत, तसेच त्यांना योग्य उपचार मिळावेत यासाठी हा कक्ष कार्यरत असेल. राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री मा. राजेश टोपे आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांचेही मार्गदर्शन या कक्षाला लाभणार आहे. राज्यातील सर्व २८८…

Read More

नवी दिल्ली – देशात करोनाच्या पार्श्वभूमीवर लसीकरणावर भर देण्यात येत आहे. देशभरात करोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक घट होत आहे. मात्र करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका वर्तविला जात आहे. करोनाच्या या तिसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. सध्या तीन लस भारतात उपलब्ध आहेत. दरम्यान भारत सरकारने जॉन्सन अँड जॉन्सनच्या सिंगल डोस लशीला भारतातील वापराला मंजुरी दिली आहे.जॉन्सन अँड जॉन्स कंपनीने लशीच्या आपत्कालीन वापरासाठी भारताकडे मंजुरी मागितली होती. भारत सरकारने जॉन्सन अँड जॉन्सनच्या सिंगल डोस लशीला भारतातील वापराला मंजुरी दिली आहे. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने ट्विट करुन दिली आहे. सध्या देशात कोव्हॅक्सिन व कोव्हिशिल्ड या दोन भारतीय लशींच्या व्यतिरिक्त…

Read More