• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

मुंबईत डेल्टा प्लसचा पहिला बळी

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
August 13, 2021
in आरोग्य, राज्य
0
मुंबईत डेल्टा प्लसचा पहिला बळी

मुंबई (वृत्तसंस्था ) – कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिअंटमुळे मुंबईमध्ये पहिल्या मृत्यूची नोंद झाली आहे. कोरोना डेल्टा प्लस व्हेरिअंटमुळे घाटकोपरमधील एका ६३ वर्षीय महिलेचा जुलै महिन्यामध्ये मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रात डेल्टा व्हेरिअंटमुळे झालेला हा दुसरा मृत्यू आहे. यापूर्वी रत्नागिरीमधील एका ८० वर्षीय महिलेचा डेल्टा व्हेरिअंटमुळे १३ जून रोजी मृत्यू झाला होता.

डेल्टा व्हेरिअंटमुळे मुंबईमधील या महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती ११ ऑगस्ट रोजी समोर आली आहे. मुंबई महानगरपालिकेने केलेल्या कॉनटॅक्ट ट्रेसिंगमध्ये हा खुलासा झाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने कोरोना रुग्णामधील जिनोम सिक्वेन्सींगच्या अभ्यासामध्ये सात जणांना डेल्टा प्लस व्हेरिएटची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर महापालिकेने डेल्टा प्लस व्हेरिअंटच्या रुग्णांचा शोध सुरु केला. याच चाचण्यांदरम्यान या महिलेचीही चाचणी घेण्यात आलेली. कुटुंबियांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या माहितीनुसार या महिलेचा मृत्यू २७ जुलै रोजी झाला. आता या महिलेच्या संपर्कात आलेल्या दोघांना डेल्टा व्हेरिअंटचा संसर्ग झाला आहे.

डेल्टा व्हेरिअंटमुळे ६३ वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला. या महिलेच्या जवळच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींचे आम्ही कॉनटॅक्ट ट्रेसिंग केले आहे. त्यापैकी सहाजण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांच्या चाचण्यांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. यापैकी दोघांना डेल्टा व्हेरिअंटचा संसर्ग झाला आहे. इतरांच्या अहवालाची आम्ही वाट पाहत असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली आहे. डेल्टा व्हेरिअंटमुळे मुंबईत झालेला हा पहिला मृत्यू असल्याचेही गोमारे यांनी म्हटले आहे.

श्वसनासंदर्भात त्रास या महिलेला असल्यामुळे तिला घरीच ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते. या महिलेने लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही तिची कोरोना चाचणी २१ जुलै रोजी पॉझिटीव्ह आली. २४ जुलै रोजी तिला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले, जिथे तीन दिवसांच्या उपचारानंतर तिचा मृत्यू झाला.

Previous Post

निवडणूक आयोगाची वेबसाइट हॅक केल्याप्रकरणी एकाला अटक

Next Post

दुचाकी चोरी प्रकरणी चौघांना अटक

Next Post
दुचाकी चोरी प्रकरणी चौघांना अटक

दुचाकी चोरी प्रकरणी चौघांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आधीच चर्चा झाली ; मंत्री देसाई !
राजकारण

राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आधीच चर्चा झाली ; मंत्री देसाई !

June 20, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

जळगावात चारचाकीचा थरार : अनेक वाहनासह महिलेला दिली जबर धडक !

June 20, 2025
नकली नोटा चलनात आणणाऱ्या दोघांना अटक
क्राईम

जळगावात शालकाने केली मेहुण्याची तब्बल तीन कोटींत फसवणूक !

June 20, 2025
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

भुसावळात विवाहितेचा छळ; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल !

June 20, 2025
खान्देशात भरधाव बसला ट्रकची धडक : ९ प्रवासी गंभीर जखमी !
क्राईम

खान्देशात भरधाव बसला ट्रकची धडक : ९ प्रवासी गंभीर जखमी !

June 20, 2025
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज जळगाव जिल्हा दौरा : विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन
Uncategorized

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज जळगाव जिल्हा दौरा : विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन

June 20, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group