जळगाव (प्रतिनिधी ) ;-शहरात वाहनांचे लहान मोठे अपघात होत असल्याच्या घटना दररोज कुठे ना कुठे घडत असून आज येथील अजिंठा चौफुलीजवळ असणाऱ्या ईदगाह कॉम्लेक्स समोरील रस्त्यावर दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने डंपर क्रमांक (एमएच १९ झेड ७७४७ ) हे दुभाजकावर जाऊन धडकल्याची घटना घडली. सुदैवाने यात कुणालाही इजा झाली नाही. दरम्यान रविवार असल्याने फारशी वर्दळ नसल्याने वाहतुकीलाही फार खोळंबा झाला नाही. .
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
जळगाव – आगामी काळातील जळगाव जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणूकीच्या दृष्टीने जळगाव ग्रामीणमध्ये पक्ष बळकटीकरणासाठी जळगाव ग्रामीण काँग्रेस कमिटीतर्फे दौरे सुरु झाले आहे. जळगाव ग्रामीणमधील जळके, विटनेर येथून दौर्यांना सुरुवात झाली आहे. जळगाव जिल्ह्यात काँग्रेसचे बळकटीकरणासाठी पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नविन कार्यकर्त्यांच्या जोडणीसाठी जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रावेरचे आमदार शिरीष चौधरी, माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, जळगाव जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.संदिपभैय्या पाटील यांच्या आदेशान्वये काँग्रेस कमिटीचे जळगाव ग्रामीण तालुकाध्यक्ष मनोज दिगंबर चौधरी यांनी जळगाव ग्रामीण दौरे सुरु केले आहे. दौर्या दरम्यान जुन्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी होत असून मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. जळगाव ग्रामीण येथील जळके, विटनेर तसेच म्हसावद-बोरनार गट पूर्ण…
खताने भरलेला ट्रक कलंडला ; सुदैवाने जीवित हानी टळली जळगाव (प्रतिनिधी) ;- शहरातील अजिंठा चौफुली ते ईच्छादेवी चौफुलीदरम्यान महामार्गावर असलेल्या नाल्याच्या पुलाजवळ शनिवारी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान खड्डा चुकवीत असताना रासायनिक खतांनी भरलेला ट्रक पलटी झाल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे ट्रकचे एक्सल तुटून हजारोंचे नुकसान झाले. यात सुदैवाने जीवाची हानी झाली नाही. राष्ट्रीय महामार्गावरील कादर मोटर्स समोरील पुलावर केमिकल फर्टीलायझरने भरलेला ट्रक पलटी झाला. सुदैवाने या दुर्घटनेत जिवितहानी टळली आणि मोठा अपघात होण्यापासून वाचला. परंतु या मार्गावरील रस्त्यांची दुरावस्था आणि पुलाचे काम सुरु असूनही सुरक्षिततेची कोणतीही व्यवस्था न केल्याने या रस्त्यावर नेहमी अशा दुर्घटना होत असतात. प्रशासनाने याची गांभीर्याने…
जळगाव (प्रतिनिधी ) राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे सध्या रुग्णालयात असल्याची माहिती आहे. गेल्या आठवडाभरापासून त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना बॉम्बे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहे. मूत्रमार्गाचा संसर्गामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते आणि त्यानंतर त्यांच्यावर आठवडाभर उपचार सुरू आहेत. दरम्यान त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे आणि त्यांचे कुटुंबीय सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) चौकशीमध्ये अडकले आहेत. एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना जुलै महिन्यात ईडीकडून ताब्यात घेण्यात आले होते. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणामध्ये गिरीश चौधरी हे अटकेत आहेत. तर एकनाथ खडसेंना देखील ईडीच्या चौकशीला सामोरे जावे लागले होते.
जळगाव (प्रतिनिधी );- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने संलग्न महाविद्यालये व प्रशाळांसाठीचे येत्या शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक जाहीर केले आहे १ सप्टेंबर पासून नव्या शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होत आहे. देशातील कोवीड- १९चा प्रादुर्भाव कमी होईपर्यंत महाराष्ट्र शासन व विद्यापीठ अनुदान आयोगाकडून पुढील सूचना प्राप्त होईपर्यंत आनलाईन वर्ग सुरू राहतील . प्रभारी कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन व प्रभारी प्र-कुलगुरू प्रा. बी. व्ही. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नव्या शैक्षणिक सत्राचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ६ आगस्ट पासून पदवी व पदव्युत्तर प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून ३० सप्टेंबरपर्यंत प्रवेश प्रक्रिया आनलाईन/ आफलाईन पद्धतीने पूर्ण केली जाईल. नवीन शैक्षणिक सत्राच्या परीक्षा १३ डिसेंबर २०२१…
जळगाव;- महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा जळगाव जिल्हापुर्वचे अध्यक्ष प्रशांत सुरेश सुरळकर यांची नाशिक विभाग तेली समाजाच्या कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा या संस्थेच्या नावात बदल झाला असून प्रदेश तेली महासंघ महाराष्ट्र राज्य असे नामकरण करण्यात आले आहे. प्रदेश तेली महासंघ महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष विजय चौधरी यांनी प्रशांत सुरेश सुरळकर यांना प्रदेश तेली युवक महासंघ नाशिक विभागाच्या कार्याध्यक्ष या पदावर नियुक्तीपत्र देऊन अभिनंदन केले. माजी मंत्री आणि तेली समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष जयदत्त क्षीरसागर यांचे आदेशानुसार तसेच माजी खासदार सुरेश वाघमारे , विक्रांत चांदवडकर, प्रदेश महासचिव ज्ञानेश्वर दुर्गुळे, विजय काळे ,महिलाअध्यक्ष सौ संध्याताई सव्वालाखे, प्रदेश…
टोकियो (वृत्तसंस्था ) ;-ऑलिम्पिकमधील भालाफेक स्पर्धेत भारताचा अव्वल खेळाडू नीरज चोप्रा याने अंतिम शानदार कामगिरी करताना सुवर्णपदकाची कमाई केली. त्याच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे भारताचा सुवर्णपदकाचा 12 वर्षांचा दुष्काळ समाप्त झाला आहे. त्याच्या या कामगिरीमुळे भारतीयांच्या माना उंचावल्या आहेत. नीरजने अंतिम फेरीत पहिला थ्रो 87.03 आणि दुसरा थ्रो 87.58 मीटर भालाफेक करून सुवर्णपदकावर नाव कोरलं. ऑलिम्पिक स्पर्धेत वैयक्तीक सुवर्णपदक मिळवणारा नीरज दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. याआधी नेमबाजीत 10 मीटर एअप रायपल प्रकारात 2008 मध्ये अभिनव बिंद्रा याने सुवर्णपदक पटकावले होते. भालाफेक प्रकारात पदक जिंकणारा नीराज पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. याआधी अ गटातील पात्रता फेरीतील कामगिरीच्या निकषावर नीरजला थेट अंतिम…
जळगाव,;- मौजे निंभोरा, ता. धरणगाव येथील रहिवाशी भागवत भिका पाटील यांचा शेतातून घरी परत येत असताना निंभोरे लगत खैऱ्या नाल्याला अचानक आलेल्या पुरात वाहून गेल्याने 17 जुलै, 2021 रोजी मयत झाले. शासनाच्या नैसर्गिक आपत्ती योजनेअंतर्गत स्व. भागवत पाटील यांच्या वारस पत्नी श्रीमती मालुबाई भागवत पाटील यांना चार लाख रुपयांचा धनादेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी पं. स. सभापती प्रेमराज पाटील, माजी उपसभापती डी.ओ. पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय पाटील, तहसीलदार नितीनकुमार देवरे, जिल्हा परिषद सदस्य गोपाल चौधरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
वर्ड व्हिजन इंडियाचा उपक्रम धरणगाव (प्रतिनिधी ) – येथील तालुक्यातील असलेली पोखरी तांडा या गावात मागील बऱ्याच वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या जाणवत होती होती. ग्रामस्थ शेतातील पाणी हंड्यात भरून स्वतः डोक्यावर वाहत घरी आणत. हे पाणी खाजगी विहीर आणि खाजगी बोअरवेल मधून आणत असत. पाणी लांब अंतरावरून आणत असल्यामुळे दिवसाचा बराच वेळ पाणी वाहण्यात जात असे म्हणून रोजगाराची देखील समस्या निर्माण झाली होती. वर्ल्ड व्हिजन इंडिया मागील दोन वर्षांपासून या गावांमधे गरीब कुटुंबांतील मुलांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी विविध कार्यक्रम हाती घेवून राबवत आहे. मुलांच्या आरोग्यासाठी विविध कार्यक्रम जसे, पोषण आहार, मुलांची सुरक्षा विषयी जनजागृती, महिला सबलीकणासाठी आणि कोविड १९…
जळगाव (प्रतिनिधी ) ;- शहरातील शिवाजी नगर भागात असणाऱ्या जुन्या कानळदा जकात नाका तोडण्यासाठी मनपाचे जेसीबी आणि ट्रॅक्टर घेऊन गेलेल्या नगरसेवकाला अवैध व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींनी मारहाण केल्याची घटना आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली असून याबाबत शहर पोलीस स्टेशनला नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी तक्रार केली आहे. शिवाजी नगरातील नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी जुन्या कानळदा जकात नाक्यावर अवैध दारू विक्री तसेच महिलांची छेडखानी होत असल्याचे प्रकार घडत असल्याने हा जकात नाका तोडण्यात यावा अशी मनपाकडे वेळोवेळी तक्रार आणि मागणी केली होती. त्यामुळे नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी आज मनपाचे बुलडोझर घेऊन कानळदा जकात नाका पाडण्यासाठी आले असता त्यांना भोई नामक व्यक्तीने दमदाटी…

