मुबई (वृत्तसंस्था ) आज मी जन आशीर्वाद यात्रेनिमित्त बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या ठिकाणी नतमस्तक झालो. साहेब आज तुम्ही आशीर्वाद द्यायला हवे होता असेही राणे यावेळी म्हणाले. जे काही घडले, तुमच्यामुळे घडलो. आज बाळासाहेब असते तर आशीर्वाद दिले असते. आज बाळासाहेब नसले तरीही आशीर्वाद डोक्यावर आहेत. बाळासाहेब असते तर म्हणाले असते की नारायण अशीच प्रगती करत रहा. त्यामुळेच कोणत्याही व्यक्तीचे स्मारक असो विरोधाची भाषा नको, त्या भावनेचा आदर करायला हवा असेही राणे म्हणाले. ज्यांना विरोधात बोलायचे आहे त्यांनी स्वतः बोलाव, उजव्या डाव्यांना बोलायला लावू नये. आम्ही त्यांनाही थेट उत्तर देऊ. कोणी आपल्यात मांजरीसारखे आडवे येऊ नये असेही राणे म्हणाले. येत्या महापालिका निवडणुकीत…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
जळगाव;- यावल तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या कुशीत असलेल्या गावांसाठी जळगाव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुढाकाराने विशेष आरोग्य शिबीरासह आदिवासी विकास विभागाच्या योजना, त्यांचे संरक्षण आणि कायदे,आपात्कालीन कार्य, वन्यजीव जनजागृती, कोरोना विषयक जनजागृती व लसीकरण मोहीम राबविण्यात आली. रावेर आणि यावल तालुक्यातील गारखेडा, उसमळी, जामन्या, गाडऱ्या आणि लंगडाआंबा या भागातील आदिवासी बांधवांसाठी विशेष शिबिराचे आयोजन बुधवारी सातपुडा विकास मंडळ, पाल संचलित जामन्या येथील आश्रमशाळेत करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. ए. ए. शेख हे होते. तर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीरसिंह रावळ, अँड. सागर चित्रे, विजय दर्जी, शरद न्हायदे, यावल पंचायत…
जळगाव (प्रतिनिधी ) लोककलावंना आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने शासन विविध स्तरावर विचार करत आहे. त्या अनुषंगाने लोक-कलावंताद्वारे कोरोना विषयक जनजागृती करून त्याला आर्थिक मदत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने राज्यस्तरावर लोककलावंत निवड समितीची स्थापना केली आहे. त्यात जळगावचे प्रसिद्ध लोकनाट्य कलावंत तथा खान्देश लोककलावंत विकास परिषदेचे अध्यक्ष विनोद ढगे यांची सदस्यपदी निवड झाली. समितीत राज्यभरातून लोककलेच्या क्षेत्रातील अभ्यासक, तज्ञांचा समावेश असून त्यात जळगावसह धुळे, नंदुरबार, नाशिक, नगर या जिल्ह्यातील लोककलावंताची निवड व पडताळणी करून शासनाच्या या मदतीपासून कुठलाही लोककलावंत वंचित रहाणार नाही यांची दक्षता घेतली जाणार आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात त्या जिल्ह्यातील कलावंताच्या संख्येनुसार प्रत्येक कलावंताला ५ हजार रुपयांची…
जळगाव ;- जिल्हा कोवीड रुग्णालयाने आज पाठवलेल्या कोरोना अहवालात दिवसभरात १ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे, तर ३ बाधित रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. जळगाव जिल्ह्यात आज पारोळा तालुक्यात एक रूग्ण आढळला आहे. तर ३ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहे. सध्या ३३ रुग्ण विविध कोवीड सेंटरमध्ये उपचार घेत आहे. जिल्हा प्रशासनाने आज पाठवलेल्या कोरोना अहवालात आजपर्यंत १ लाख ४२ हजार ६७१ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून त्यापैकी १ लाख ४० हजार ६३ रुग्ण कोरोनामुक्त मुक्त होऊन घरी परतले आहे. तर आज पर्यंत २ हजार ५७५ कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
मुंबई ;- राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री ना गुलाबराव पाटील आणि आमदार चिमणराव पाटील यांनी आज मुंबईत माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची सदिच्छा भेट घेतली. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची प्रकृती बिघडल्याने ते बॉंबे हॉस्पीटलमध्ये उपचार घेत होते. त्यांना अलीकडेच डिस्चार्ज मिळाला आहे. कालच माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील यांनी नाथाभाऊंची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली होती. याप्रसंगी जिल्हा बँक निवडणुकीबाबतही चर्चा करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान, आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील आणि आमदार चिमणराव पाटील यांनी नाथाभाऊंची भेट घेतली. यात त्यांनी प्रकृतीची चौकशी करून त्यांना लवकरच स्वास्थ…
जळगाव ;- जिल्ह्यात यंदा 90 हजार क्विंटल उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी 50 हजार क्विंटल खरेदी झाली तर अद्याप 40 हजार क्विंटल ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट बाकी आहे. 31 जुलै रोजी अनेक खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांच्या नोंदणीकृत खरेदी विक्रीसाठी वाहनांच्या रांगा उभ्या असतांना त्यांना ज्वारी विक्री पासून वंचित ठेवण्यात आले. वेळीच नोंदणी करून देखील त्यांच्या कडून शासनाने ज्वारी खरेदी केलेली नाही. या मुळे अनेक शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. तर अनेक शेतकऱ्यांना वाहनाचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला. या करिता खरेदीला मुदतवाढ मिळणेसाठी राज्य शासनामार्फत केंद्र शासनाला मागणी प्रस्ताव पाठविणे आवश्यक आहे.त्यामुळे राज्य शासनाने खरेदीच्या मुदतवाढीचा प्रस्ताव त्वरित पाठविण्यात यावा. नोंदणी करुन…
जळगाव I प्रतिनिधी शिक्षण पध्दतीत दिवसेंदिवस बदल होत आहेत हे बदल स्वीकारून शिक्षकांनी अद्ययावत शिक्षण आत्मसात करण्याकडे जास्तीत जास्त लक्ष देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा.आर.एस.माळी यांनी केले. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मानव संसाधन केंद्र व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या स्कुल ऑफ केमिकल सायन्सेस येथे ‘रोल ऑफ टिचर्स ईन अकेडमिक, रिर्सच अॅण्ड इंडस्ट्री’ या विषयावर ऑनलाईन रिफ्रेसर कोर्सचे आयोजन दि.१७ ते ३० ऑगस्ट, २०२१ या कालावधीत करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी प्रा.आर.एस.माळी बोलत होते. यावेळी प्रभारी कुलगुरू प्रा.ई.वायुनंदन यांची ऑनलाईन अध्यक्ष म्हणून उपस्थिती होती. यावेळी प्रमुख पाहूणे…
जळगाव – सन २०२१-२०२२ या वर्षासाठी रोटरी जळगाव ड्रिस्ट्रीक्टचे गर्व्हनर असलेल्या रोटेरीयीन रमेश मेहर यांनी डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला भेट दिली, या भेटीत रुग्णालयातील आयसीयू, मदर मिल्क बँक तसेच विविध विभागाची पाहणी करुन रुग्णांना देण्यात येणार्या सेवा-सुविधांबद्दल मेहर यांनी समाधान व्यक्त केले. रोटरीचे ड्रिस्ट्रीक्ट गर्व्हनर रमेश मेहेर हे बुधवार, १८ ऑगस्ट रोजी ऑफिशियल क्लबच्या भेटीसाठी आले होते. याप्रसंगी त्यांनी गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला भेट दिली. सर्वप्रथम डिस्ट्रीक्ट गर्व्हनर रमेश मेहेर यांनी डॉ.उल्हास पाटील रुग्णालयातील आयसीयू, नव्याने स्थापन झालेली मदर मिल्क बँक, ब्लड बँक तसेच अन्य विभागांना भेटी दिल्यात, याप्रसंगी रुग्णालयातून दिल्या जाणार्या सेवेबद्दल…
जळगाव ;- येथील हरिविठ्ठल नगरात राहणाऱ्या १४ वर्षीय मुलगी नाल्याजवळ उभी असताना पाय घसरून पडल्याने ती वाहून गेल्याची घटना आज दुपारी घडली असून त्या मुलीची ओळख पटली आहे. गायत्री सुरेश मिस्तरी (वय-१४ ) रा. कोळन्हावी ता. यावल ह.मु.हरीविठ्ठल नगर जळगाव असे मयत मुलीचे नाव आहे. , गायत्री मिस्तरी ही अल्पवयीन मुलगी वडील सुरेश शामराव मिस्तरी आणि आई सिमाबाई मिस्तरी यांच्यासह लहान बहिण सोनू सोबत राहते. आज बुधवार १७ ऑगस्ट रोजी सकाळी वडील सुरेश मिस्तरी हे अयोध्या नगरात कामावर निघून गेले. आई सिमाबाई घरात होत्या. सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास गायत्री हि कोणालाही न सांगता घरातून निघून गेल्या. गायत्रीच्या पश्चात आई वडील,…
जळगांव प्रतिनिधी ;- डॉ. तेजपाल यांच्या कांदबऱ्यांवर गांधीवादी विचारसरणीचा मोठा प्रभाव दिसून येतो असे प्रतिपादन सुप्रसिध्द हिंदी साहित्यिक डॉ.ओमप्रकाश शर्मा यांनी केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या भाषा अभ्यास प्रशाळा आणि संशोधन केंद्राच्या हिंदी विभागाच्यावतीने आयोजित स्व. डॉ.तेजपाल चौधरी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ऑनलाईन राष्ट्रीय व्याख्यानमालेचे चौथे पुष्प गुंफतांना डॉ.ओमप्रकाश शर्मा बोलत होते. यावेळी डॉ.उर्मीला पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. शर्मा म्हणाले की, सत्य, अहिंसा, शिक्षण, स्त्रीयांचा सन्मान, स्वदेशी, सत्याग्रह अशा गांधी विचारांचा प्रभाव डॉ.चौधरी यांच्या साहित्यामध्ये दिसून येतो. हे विचार लादलेले नव्हते तर गांधी विचारांची सरमिसळ त्यांच्या व्यक्तीमत्वामध्ये झालेली होती. यावेळी डॉ.उर्मीला पाटील यांनी डॉ.चौधरी यांच्या आठवणींना यावेळी उजाळा…

