Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहरासह पाचोरा तसेच सोयगाव तालुक्यांतून दुचाकी चोरणार्‍या शहापूर येथील तीन जणांना स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवार २० ऑगस्ट रोजी अटक केली आहे. शुभम राजेंद्र परदेशी वय २१ दीपक सुनील खरे वय २२ शुभम शांताराम माळी वय २१ तिन्ही रा.शहापुर ता.पाचोरा अशी संशयितांची नावे आहेत. तिघांकडून सात चोरीच्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. पोलिस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, अपर पोलिस अधीक्षक सचिन गोरे यांनी जळगाव जिल्ह्यातील गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना व मार्गदर्शन स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या.त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक जयकुमार बकाले यांनी सहायक फौजदार अशोक महाजन, विजय पाटील ,प्रदीप…

Read More

धरणगाव ;- तालुक्यातील चिंचपूर बुद्रुक येथे १९ रोजी येथे पिक पाहणी बाबत माहिती व प्रात्यक्षिक तहसीलदार नितीन कुमार देवरे यांनी बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले . याप्रसंगी चिंचपुर बुद्रुकचे सरपंच कैलास पाटील , विजय पाटील, मंडळ अधिकारी एस आर बोरसे, तलाठी राहुल ढेरंगे, वाहनचालक मनोज पाटील, असलम पटेल यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. . सदर ॲप द्वारे 15 सप्टेंबरपर्यंत पिक पाहणी शेतकरी बांधव स्वतः लावू शकतील अशी माहिती यावेळी तहसीलदार नितींकुमार देवरे यांनी दिली. त्याचबरोबर शेतकरी बांधवांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून याबाबत माहिती देण्यात आली.

Read More

सिंदखेड राजा ;- बुलडाण्यात भीषण अपघातात 13 मजुरांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. सिंदखेडराजा तालुक्यातील तढेगाव फाट्याजवळ टिप्पर पलटी झाल्याने 13 मजुरांचा मृत्यू झाला, तर 10 जण जखमी झाले आहेत. लोखंडी रॉड घेऊन टिप्पर मजुरांसह समृद्धी महामार्गाकडे जात असताना हा अपघात झाल्याची माहिती मिळते आहे. विरूद्ध दिशेने येणाऱ्या एका बसला जाण्यासाठी जागा करून देताना टिप्पर रस्त्याच्या कडेला पलटी झाला. या टिप्परमध्ये लोखंडी रॉड होते. या रॉडखाली 16 मजूर दाबले गेले. त्यातील 8 जणांचा घटनास्थळी तर 5 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जखमी मजुरांवर किणगाव राजा, सिंदखेडराजा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. काही गंभीर जखमींना जालना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलंय.

Read More

जळगाव ;- येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज सद्भावना दिन साजरा करण्यात आला. माजी प्रधानमंत्री भारतरत्न स्व. राजीव गांधी यांचा जन्मदिवस सद्भावना दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी अभिवादन करून उपस्थित अधिकारी व कर्मचा-यांना सद्भावना दिनानिमित्त प्रतिज्ञा दिली. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, उपजिल्हाधिकारी महसुल श्रीमती शुभांगी भारदे, प्रांताधिकारी प्रसाद मते, तहसिलदार सर्वसाधारण सुरेश थोरात, तहसिलदार महसुल पंकज लोखंडे यांचेसह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Read More

जळगाव ;- इनरव्हील क्लब ऑफ जळगाव न्यू जनरलतर्फे रिंग रोड परिसरातील यशवंतनगरात इनरव्हील बोटॅनिकल फॉरेस्ट गार्डन साकारले आहे. यात 300 औषधी वनस्पतींचे वृक्षारोपण केले. या ठिकाणी नागरिकांना शांततेत बसता यावे, त्यांना ताजी व शुद्ध हवा मिळावी, यासाठी बेंचेस देखील प्रदान करण्यात आले. भविष्यात हे अनोखे गार्डन आयुवैदीक औषधींसह शुद्ध ऑक्सिजनसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या औषधी व जास्तीत जास्त ऑक्सिजन देणार्‍या वनस्पतींच्या रोपांचे सर्वांनी संवर्धन करावे. इनरव्हील क्लब ऑफ जळगाव न्यू जनरलचा हा पर्यावरणासाठीचा आगळा-वेगळा जळगाव पॅटर्न ठरावा. या उपक्रमापासून इतरांनी प्रेरणा घेऊन त्यांनी सुद्धा हा पॅटर्न राबवावा, असे मत माजी महापौर सीमा भोळे, भाजपाच्या दिप्ती चिरमाडे, महानगरपालिकेचे अभियंता योगेश वाणी…

Read More

जळगाव ;- सुप्रीम कंम्पनीजवळ असलेल्या शेतामधून अज्ञात चोरटयांनी पीव्हीसी पाईप लांबविल्याची घटना घडली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जफरोद्दिन रहिमोद्दिन पिरजादे (वय ७६, रा. जुना मेहरूण पिरजादेवाडा जळगाव) हे शेतकरी असून सुप्रिम कंपनीच्या जवळच त्यांची शेती आहे. १७ ऑगस्ट सकाळी ७ ते १८ ऑगस्टच्या सकाळी १० वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या शेतात असलेल्या २५ हजार रूपये किंमतीचे २० फुट लांबीचे ३५ पिव्हीसी पाईप आणि ५ हजार रूपये किंमतीचे इतर साहित्य असा एकुण ३० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे.

Read More

जळगाव प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन व अध्ययन व विस्तार विभागाच्यावतीने सुरू असलेल्या ‘ज्येष्ठ नागरिक सहाय्यता दूत’ प्रशिक्षण शिबीराचा उद्या ‍शनिवार दि.२१ ऑगस्ट रोजी समारोप होणार आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी पन्नास ‘सहाय्यता दूत’ पहिल्या टप्प्यात तयार केले जात असून त्यासाठी १७ ऑगस्ट पासून त्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. उद्या शनिवारी दुपारी २ वाजता या प्रशिक्षणाचा समारोप होणार असून यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती रंजना पाटील, व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद, प्रभारी कुलसचिव प्रा.ए.बी.चौधरी यांची उपस्थिती राहणार असून प्रभारी प्र-कुलगुरू प्रा.बी.व्ही.पवार अध्यक्षस्थानी राहतील अशी माहिती विभागाचे प्रभारी संचालक प्रा.मनिष जोशी यांनी दिली.

Read More

जळगाव ;- हतनूर धरणाचे पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने आज सकाळी 7 वाजता धरणाचे 14 दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहेत. आज दि. 20 ऑगस्ट रोजी सकाळी 7.00 वाजता धरणातून तापी नदीपात्रात 40894 क्युसेक पाणी सोडण्यात आले आहेत. धरण क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने पाणी प्रवाह अजून वाढण्याची शक्यता असल्याने हतनूर धरणाचे खालील गावांमधील नागरिकांनी तापी नदीपात्रामध्ये कुणीही आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदी पात्रामध्ये जाऊ नये. असे आवाहन कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग, जळगाव यांचेतर्फे करण्यात आले आहे.

Read More

जळगाव ;- शहरात असणाऱ्या बोहरा गल्ली येथून अज्ञात चोरट्याने दुचाकी लंपास केल्याची घटना उघडकीस आळून याबाबत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , योगेश बाबुराव पाटील (वय-४५) रा. इंद्रप्रस्थ नगर जळगाव हे हातमजूरी करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. नेहमी प्रमाणे १७ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास ते बोहरागल्लीत कामानिमित्त (एमएच १९ एमएम १३१८) दुचाकी पार्किंगला लावली होती. याबाबत त्यांच्या तक्रारीवरून शनीपेठ पोलीसात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक मनोज येऊलकर करीत आहे.

Read More

जळगाव ;- आज जिल्ह्यात दिवसभरात २ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे, तर ३ बाधित रुग्ण कोरोनामुक्त झाले ३ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहे. सध्या ३२ रुग्ण विविध कोवीड सेंटरमध्ये उपचार घेत आहे. जिल्हा प्रशासनाने आज पाठवलेल्या कोरोना अहवालात आजपर्यंत १ लाख ४२ हजार ६७३ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून त्यापैकी १ लाख ४० हजार ६६ रुग्ण कोरोनामुक्त मुक्त होऊन घरी परतले आहे. तर आज पर्यंत २ हजार ५७५ कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

Read More