• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

‘आजादी का अमृत महोत्सव’ जागर यात्रेस जळगाव जिल्ह्यात प्रारंभ

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
August 25, 2021
in जळगाव
0
‘आजादी का अमृत महोत्सव’ जागर यात्रेस जळगाव जिल्ह्यात प्रारंभ

जळगाव ;- भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या गौरवशाली अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने देशभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो, पुणे व क्षेत्रिय लोक संपर्क ब्युरो, जळगाव यांच्यावतीने जळगाव जिल्ह्यात 23 ते 29 ऑगस्ट दरम्यान जागर यात्रा फिरणार आहे.
जळगाव जिल्ह्यात राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी देशाच्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण करण्याचे आवाहन पालकमंत्री श्री. पाटील यांनी केले. येणारे वर्षभर अमृत महोत्सवाचे निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन शासनस्तरावर करण्यात येणार आहे. कोविडचे संकट अजुन संपलेले नाही. त्यामुळे कोविडच्या सर्व नियमांचे पालन करुन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहाने साजरा करण्याचे आवाहन त्यांनी केले.

त्याचबरोबर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून या जागर यात्रेचा प्रारंभ करुन या जागर यात्रेस शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांचेसह मान्यवर उपस्थित होते.

या जागर यात्रेत दिशा समाज प्रबोधन बहुउद्देशिय संस्थेच्या कलापथकाव्दारे सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा जागर करण्यात येणार आहे. देशभक्ती, देशप्रेम, राष्ट्रीय एकात्मता व आत्मनिर्भर भारताचा संदेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.

क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरोचे सहायक क्षेत्रीय प्रचार अधिकारी प्रदिप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही यात्रा जिल्हाभरात फिरणार असून कोविडचे नियम पाळून स्थानिक लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, कर्मचारी व नागरीकांनी यात सहभागी व्हावे. असे आवाहन भारत सरकारच्या प्रादेशिक लोक संपर्क ब्यूरो, पुणे (महाराष्ट्र व गोवा राज्य) यांच्यामार्फत प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Previous Post

विद्यापीठात ऑनलाईन राष्ट्रीय व्याख्यानमालेचा समारोप

Next Post

धरणगाव पोलीस स्टेशनचा पोनि शंकर शेळके यांनी स्वीकारला पदभार

Next Post
धरणगाव पोलीस स्टेशनचा पोनि शंकर शेळके यांनी स्वीकारला पदभार

धरणगाव पोलीस स्टेशनचा पोनि शंकर शेळके यांनी स्वीकारला पदभार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोठी दुर्घटना :  मालगाडीला भीषण आग : अनेक रेल्वे गाड्या रद्द !
क्राईम

मोठी दुर्घटना : मालगाडीला भीषण आग : अनेक रेल्वे गाड्या रद्द !

July 13, 2025
मोठी बातमी : अखेर ज्येष्ठ सरकारी वकील उज्वल निकम झाले खासदार !
क्राईम

मोठी बातमी : अखेर ज्येष्ठ सरकारी वकील उज्वल निकम झाले खासदार !

July 13, 2025
भरधाव डंपरची एसटी बसला जबर धडक : १९ प्रवासी जखमी !
क्राईम

भरधाव डंपरची एसटी बसला जबर धडक : १९ प्रवासी जखमी !

July 13, 2025
अमळगावनजीक शेतमजुरांच्या वाहनाला अपघात : २२ जण जखमी !
क्राईम

अमळगावनजीक शेतमजुरांच्या वाहनाला अपघात : २२ जण जखमी !

July 13, 2025
विद्यार्थ्याच्या मृत्युप्रकरणी उलगडा : वर्गमित्राविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल !
क्राईम

विद्यार्थ्याच्या मृत्युप्रकरणी उलगडा : वर्गमित्राविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल !

July 13, 2025
मोठी बातमी : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे डॉ.नितीन पाटील यांचा भाजपात प्रवेश
जळगाव

मोठी बातमी : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे डॉ.नितीन पाटील यांचा भाजपात प्रवेश

July 13, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group