जळगाव;- बोरी धरणाचे पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने आज 25 ऑगस्ट रोजी सकाळी 8.00 वाजता बोरी धरणाचा एक दरवाजे 0.15 मीटरने उघडण्यात आला असून बोरी नदीपात्रात 451 क्युसेक्स पाणी प्रवाह सोडण्यात आला आहे. तरी बोरी धरणाचे खालील नदी काठावरील गावांमधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत असून बोरी नदीपात्रामध्ये कुणीही आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदी पात्रामध्ये जाऊ नये. नागरिकांनी जीवित वा वित्तहानी टाळण्याच्यादृष्टीने योग्य ती खबरदारी घ्यावी. असे आवाहन कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव यांचेतर्फे करण्यात आले आहे.
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
बोदवड;- शहरातून दोन गायी चोरून नेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात अज्ञात भामट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोदवड शहरातील रेणूका नगरात राहणारे सुभाष सिताराम देवकर (वय-५२) हे शेतकरी आहे. शेती व गुरांचे पालन करून उदरनिर्वाह करतात. २४ ऑगस्ट रोजी त्यांच्या मालकीच्या गुरांच्या गोठ्यातून २० हजार रूपये किंमतीची गाय अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे सकाळी ४.३० वाजता उघडकीला आले. गावात गायीचा शोध घेत असतांना त्यांच्या गावातील संजय पांडूरंग पाटील यांची देखील २० हजार रूपये किंमतीची गाय चोरीस गेल्याचे समजले, बोदवड परिसरात गुरांच्या चोरीचे प्रमाण अधिक प्रमाणावर होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यातच आता दोन गायींची चोरी झाल्याचे उघडकीला…
यावल ;- तालुक्यातील अट्रावल सांगवी शिवारातून बैलाची चोरी करतांना एकाला शेतकऱ्याने पकडले आहे. यावल पोलीसात गुन्हा दाखल केल्यानंतर संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. चंद्रकांत विजय तावडे (वय-३५) रा. डोंगर सांगवी ता. यावल हे शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांच्याकडे बैलजोडी आहे. दरम्यान २४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास त्यांनी त्याचा २० हजार रूपये किंमतीचा बैल अट्रावल सांगवी शिवारातील शेतात बांधले होते. अट्रावल गावातील किरण दिनकर कोळी याने बांधलेला बैल चोरून नेत असतांना त्याला रंगेहात पकडले आहे. शेतकऱ्यांनी त्याला चांगला चोप देवून यावल पोलीसांच्या हवाली केले आहे. चंद्रकांत तावडे यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात संशयित आरोपी किरण कोळी याच्यावर…
जळगाव ;- विवाहितेला गेल्या दोन वर्षांपासून काहीही कारण नसतांना पतीसह सासू व सासऱ्यांकडून शारिरीक व मानसिक छळ केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयश्री अमृत भुतडा (वय-३१) रा. गांधी नगर, जिल्हापेठ जळगाव यांचा विवाह कर्नाटक राज्यातील विजयपूर येथील अमृत श्रीनिवास भुतडा यांच्याशी २० जानेवारी २०१९ रोजी रितीरिवाजानुसार झाला. लग्नाचे पहिले दोन महिने आनंदाने गेले. त्यानंतर किरकोळ व लहान लहान कारणांवरून घरात पती अमृत भुतडा हा टोमणे मारणे सुरू केले. तसचे सासू प्रेमा श्रीनिवास भुतडा, सासरे श्रीनिवास गिरदरीलाल भुतडा यांनी देखील विवाहितेला शिवीगाळ करून गांजपाठ केला. या छळाला कंटाळून विवाहिता…
जळगाव प्रतिनिधी ;- जिल्हा पोलीस प्रशासनाने अधिकार्यांच्या बदल्या केल्या असून यात निरिक्षक आणि सहायक पोलीस निरिक्षक दर्जाच्या २६ अधिकार्यांचा समावेश आहे. यातील बहुतांश अधिकारी जिल्ह्यातील असून काही बाहेरून जिल्ह्यात आले आहेत. जिल्हा पोलीस दलातील कर्मचार्यांच्या काही दिवसांपूर्वीच बदल्या झाल्या होत्या. यानंतर आता पोलीस निरिक्षक आणि सहायक पोलीस निरिक्षक दर्जाच्या अधिकार्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात खालील प्रमाणे बदल्या करण्यात आल्या आहेत. शनिपेठचे प्रभारी असणारे निरिक्षक विठ्ठल ससे यांची पोलीस निरिक्षक सुरक्षा शाखा प्रभारी येथे बदली झाली आहे.भुसावळ शहरचे निरिक्षक बाळासाहेब बाजीराव ठोंबे यांची जिविशा शाखा जळगाव प्रभारी येथे बदली करण्यात आली आहे.भुसावळ तालुका पोलीस स्थानकातील रामकृष्ण महादू कुंभार यांची जळगाव…
जळगाव प्रतिनिधी – दोन वर्षाच्या कोरोना काळात केंद्र व राज्य सरकार यांनी वेळोवेळी पूर्णतः लॉकडाऊन आणि काही वेळा निर्बंध घातल्याचा प्रतिकूल परिणाम उद्योग-व्यवसाय-व्यापारावर झाला. बहुतांश उद्योगांमध्ये कामगार यांना दीर्घ सुटी देण्यात आली किंवा कामगार कपात करावी लागली तर काहींनी वेतन कपात केली. अशाही स्थितीत जळगावमधील जैन इरिगेशन सिस्टीम्स् लि. मध्ये असे काहि न करता विविध कामांसाठी पदांवर नव्याने १०६० जणांना कायमस्वरूपी नोकरीची संधी देऊन सामावुन घेतले आहे. जैन इरिगेशन आणि संलग्न उत्पादक कंपन्यांवर सध्या वित्त पुरवठा विस्कळीत झाल्याचे संकट आहे. तरीही सामाजिक बांधिलकी ठेऊन नियमित सहकारी (कामगार) शिवाय रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्यात आल्या आहेत. सध्या जैन इरिगेशनच्या जळगाव स्थित…
जळगाव ;- डॉ. उल्हास पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयामध्ये आजपासून विविध विभागातील कामांसंदर्भात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेे. यात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी परिसर संचालक डॉ.सुधाकर पाटील, प्राचार्य डॉ.पूनमचंद सपकाळे, डॉ. शैलेश तायडे, अतुल बोंडे, प्रा. शीतल पाटील, प्रा. ललित जावळे तसेच कार्यालयातील सर्व शिक्षकेतर कर्मचारी देवेंद्र भंगाळे, माधुरी पाटील, मिलिंद तायडे, वाणी यांच्यासह कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक व सहाय्यक हे उपस्थित होते. यामध्ये शालेय कामकाजातील प्रवेश प्रक्रिया, रजिस्ट्रेशन प्रोसेस, पात्रता प्रक्रिया, स्कॉलरशिप, परीक्षा विभाग व इतर कामे या संबंधित सखोल मार्गदर्शन त्या त्या विभागातील तज्ञ व्यक्तींकडून केले जाणार आहे.
जळगाव ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने रासेयो जिल्हा व विभागीय समन्वयक यांची कार्यशाळा सोमवार, दि.२३ ऑगस्ट रोजी विद्यापीठात डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम भवन येथे घेण्यात आली. यावेळी मंचावर विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप रामू पाटील, प्राचार्य एल.पी.देशमुख, रासेयो संचालक डॉ. पंकजकुमार नन्नवरे, जिल्हा समन्वयक डॉ.मनीष करंजे (जळगाव), डॉ.सचिन नांद्रे(धुळे) आणि डॉ.विजय पाटील (नंदुरबार) हे होते. कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना श्री.दिलीप पाटील यांनी दि.२४ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर, २०२१ या कालावधीत रासेयोच्या एकक दत्तक गावात कवयित्री बहिणाबाई ग्राम वाचन कट्टा स्थापन करण्यात यावा असे सांगितले. सुरवातीस डॉ. नन्नवरे यांनी प्रास्ताविक केले. कार्यशाळेत झालेल्या चर्चेत २४ सप्टेंबर ते…
जळगाव/धुळे/नंदुरबार : गेल्या दीड वर्षांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमिवर निर्माण झालेला वीजमीटरचा तुटवडा परिणामी नवीन वीजजोडण्यांची मंदावलेली गती यावर महावितरणने धडक निर्णय घेत यशस्वी मात केली आहे. गेल्या पाच महिन्यांमध्ये सिंगल व थ्रीफेजचे तब्बल १५ लाख ७६ हजार नवीन मीटर मुख्यालयाकडून क्षेत्रीय कार्यालयांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तर उच्च व लघुदाबाच्या ५ लाख १८ हजारांवर नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. मागील वर्षी, मार्च २०२०मध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतरचा लॉकडाऊन तसेच इतर कारणांमुळे वीजमीटर उपलब्धता कमी होत गेली. त्यामुळे नवीन वीजजोडण्या देण्याचा वेग काहीसा मंदावला होता. राज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी त्यावेळी घेतलेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत वीजमीटरचा तुटवडा संपविण्याचे व नवीन वीजजोडण्यांचा…
एरंडोल;- भरधाव वेगाने पारोळ्या कडून एरंडोल कडे जाणाऱ्या ट्रकने एरंडोल कडून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली त्यात दुचाकीवरील इंद्रसिंग दगडू पाटील वय २७ वर्षे व भूषण कौतिक पाटील वय २२ वर्ष हे जळू येथील युवक जागीच ठार झाले. ही दुर्घटना रविवारी मध्यरात्री घडली.ट्रक चालक वाहन सोडून फरार झाला. याबाबत एरंडोल पोलीस स्टेशन सूत्रांनी दिलेली माहिती अशी की इंद्रसिंग दगडू पाटील व भूषण कौतिक पाटील हे दोघे युवक एरंडोल कडून एम.एच.२० एफ. क्यू. ७५०५ क्रमांकाच्या दुचाकीने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा ने जळू येथे घरी जात असताना शहा पेट्रोल पंप नजीक पारोळ्या कडून कडून भरधाव वेगाने येणाऱ्या एम.एच.१९ झेड ४५२७ क्रमांकाच्या भरधाव…

