Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

जळगाव प्रतिनिधी: पायी जाणाऱ्या नागरिकांनाच्या  हातातील मोबाईल हिसकावून मोबाईल लांबविणाऱ्या तिघांपैकी दोन जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. दोघांकडून चोरीचे दोन मोबाईल हस्तगत केला असून दोघांना जिल्हा पेठ पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.अक्षय मुकेश अटवाल आणि अक्षय आनंदा जावळे दोन्ही रा. शनीपेठ अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहे. याबाबत माहिती अशी की, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी जिल्हा पेठ पोलीसात दाखल असलेले मोबाईल हिसकावून पळ काढणाऱ्या टोळीचा शोध घेण्याच्या सुचना दिल्यात. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या पथकातील सहाय्यक फौजदार विजय पाटील, युनूस शेख, पोहेकॉ जयंत चौधरी, संदीप साळवे, पो.ना. विजय पाटील, पो.ना.…

Read More

चाळीसगाव l प्रतिनिधी दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने आलेल्या दोघांनी सराफाकडून सुमारे साडेसहा लाखांचे दागिने घेऊन पोबारा केल्याची घटना ९ रोजी घडली असून सराफ मालकाने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात डोगहनविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, अरुण मुरलीधर बाविस्कर (वय-७१) रा. राजेंद्र प्रसादरोड, पीपल्स बँकेजवळ चाळीसगाव यांचे त्यांच्या घरासमोर उदय ज्वेलर्स नावाने दागिन्यांचे दुकान आहे. काल ९ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता दोन व्यक्ती त्यांच्या दुकानावर आले. आपण ग्राहक असल्याचे भासवून त्यांनी सोन्याचे दागिने पाहण्यासाठी घेतले. दोन्ही संशयितांनी ७० हजार रुपये किमतीचे १० ग्रॅम वजनाच्या २ सोन्याची चैन, १ लाख ७१ हजार ५०० रुपये किंमतीचे विविध कानातले दागिने,…

Read More

धरणगाव प्रतिनिधी: तालुक्यातील दोनगाव येथे 12 रोजी स्वर्गीय जिजाबाई राघो पाटील यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्ताने समाजप्रबोधनकार इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे12 रोजी स्वर्गीय जिजाबाई राघो पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त डोणगाव येथे हरिभक्त पारायण श्री निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्या कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे हे आहे या कार्यक्रमाचे आयोजन हेमंत राघो पाटील किशोर राघो पाटील यांनी केले असून कोरोना संबंधित प्रशासनाने घालून दिलेले सर्व नियम कटाक्षाने पाळावे व सहकार्य करावे असे आव्हान पाटील परिवारातर्फे करण्यात आले आहे

Read More

जळगाव ;- जळगाव – गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.गुणवंतराव सरोदे आयुर्वेद मेडिकल कॉलेज, हॉस्पीटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटरच्या अधिष्ठातापदी शल्य तज्ञ डॉ.महेश चौधरी यांची निवड झाली असून त्याबद्दल नुकतेच त्यांना नियुक्‍ती पत्र प्राप्त झाले आहे. गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, उपाध्यक्ष सुभाष पाटील, सचिव डॉ.वर्षा पाटील, सदस्या डॉ.केतकी पाटील, डी.एम. कार्डियोलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील यांनी डॉ.महेश चौधरी यांच्या निवडीबद्दल शुभेच्छा दिल्यात. तसेच डॉ.केतकी पाटील यांच्याहस्ते पुष्पगुच्छ देवून डॉ.चौधरी यांना सन्मानित करण्यात आले.

Read More

विजेत्यांसाठी भरघोस रोख पारितोषिके; 2 ऑक्टोबरला पारितोषिक वितरण जळगाव । प्रतिनिधी महात्मा गांधीजींच्या 153 व्या जयंतीनिमित्त गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे राष्ट्रीय पातळीवरील एकपात्री अभिनय स्पर्धा आयोजण्यात आलेली आहे. महात्मा गांधीजींनी जवळजवळ सर्वच विषयांवर चिंतन केले, आपला प्रभाव टाकला आहे. त्यातील अभिनय हा तर त्यांच्या बालपणापासूनच आवडीचा विषय होता. विद्यार्थ्यांमध्ये अभिनय कला रुजविणे व महात्मा गांधीजींच्या विचारांच्या जीवनशैलीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. यासाठी 15 सप्टेंबर पर्यंत निःशुल्क नोंदणी व 20 सप्टेंबर पर्यंत आपले व्हिडीओ पाठविणे आवश्यक आहे. विजेते व पारितोषिक वितरण 2 ऑक्टोबरला ऑनलाईन पद्धतीने होणार आहे, असे स्पर्धेचे आयोजक गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे कळविले आहे. दोन गटासाठी…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र: रावेर तालुक्यातील आहिरवाडी येथे नुकतेच रक्तदान शिबिर संपन्न झाले यावेळी गावातील तरुणांनीव शेतकरी बांधवांनी  मोठ्या प्रमाणात या शिबिरात सहभागी झाले होते. रावेर तालुक्यातील आहिरवाडी येथे  8रोजी  श्रीराम साप्ताहिक मिलन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अहिरवाडी याच्या  तर्फे रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न झाले. जळगाव जिल्ह्यातील डेंग्यू रोगाच्या साथीला आवश्यक असलेल्या रक्ताच्या विविध घटकांसाठी ची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे;त्यात कोरोना सदृश्य परिस्थिती असल्याने रक्त तुटवडा भरपूर प्रमाणात आहे,या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन अहिरवाडी येथील सिद्धेश चौधरी,शुभम वैद्य, सुमित महाजन, पंकज महाजन, शुभम शिंदे,सागर पाटील इत्यादी स्वयंसेवकांनी रक्तदान शिबिर ठरविले व फक्त एक दिवसाच्या नियोजनात तब्बल 54 रक्तदात्यांनी रक्तदान करून सर्वांसमोर एक आदर्श उभा…

Read More

अंतुर्ली येथील दुर्दैवी घटना मुक्ताईनगर ;- विहिरीत तोल जाऊन पडल्याने आईला वाचविण्यास गेलेल्या २४ वर्षीय तरुणांचाही बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी येथे उघडकीस आली असून परिसरात या दुर्दैवी घटनेने हळहळ व्यक्त होत आहे . सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, नितीन पंढरीनाथ पाटील आणि त्याची आई प्रतिभा पंढरीनाथ पाटील (वय-४५) रा. अंतुर्ली ता. पाचोरा असे मयतांची नावे आहेत. याबाबत माहिती अशी की, प्रतिभा पंढरीनाथ पाटील यांचे अंतूर्ली शेत शिवारात शेत आहे. आज ९ सप्टेंबर रोजी त्यांच्या शेतात फवारणी करण्यासाठी मुलगा नितीन पंढरीनाथ पाटील याच्यासह गेल्या. दरम्यान, फवारणीसाठी पंपासाठी लागणारे पाणी घेण्यासाठी प्रतिभा पाटील ह्या दुपारी २ वाजेच्या त्यांच्या शेतातील…

Read More

मुंबई :- मुंबईतील प्रसिद्ध बिल्डर आणि डी गँगचा फायनान्सर युसूफ लकडावालाचाऑर्थर रोड कारागृहात मृत्यू झाला आहे. पोलिसांनी लकडावलाला जे जे रुग्णालयात नेलं होते, मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. युसूफ लकडावाला कॅन्सरने त्रस्त होता. मनी लाँडरिंगसह पैशाच्या अफरातफरी प्रकरणात ईडीने त्याला अटक केली होती. आज त्याचा मृत्यू झाला. युसूफ लकडावाला हा मुंबईतील प्रसिद्ध बिल्डर तर होताच, शिवाय तो बॉलिवूड आणि डी गँगचा मोठा फायनान्सरही होता. 2019 मध्ये जमीन खरेदीप्रकरणी सरकारी कागदपत्रामध्ये फेरफार करत पुरावे नष्ट करण्याच्या आरोपाखाली बिल्डर युसूफ लकडावालाला (76) अहमदबाद आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली होती. गुजरातमधील अहमदाबाद विमानतळावरून लंडनमध्ये पळून जाण्याच्या तयारी असलेल्या लकडावालाला अटक करण्यात झाली…

Read More

मुंबई ;- महाराष्ट्र सदनाच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. मुंबई सत्र न्यायालयाने छगन भुजबळ यांच्यासह सहा आरोपींना दोषमुक्त केलं आहे. लाचलुचपत प्रतिबंधक न्यायालयाकडे भुजबळ यांनी यासंदर्भात अर्ज दाखल केला होता. आपल्यावर करण्यात आलेल्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचं सांगत दोषमुक्त करण्यात यावं मागणी त्यांनी अर्जाद्वारे केली होती. आज (9 सप्टेंबर) न्यायालयाने छगन भुजबळ यांना महाराष्ट्र सदन प्रकरणात दोषमुक्त केल्याचं समोर आलं आहे. भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात महाराष्ट्र सदन कथित गैरव्यवहार प्रकरणी पुरावे असल्याचा एसीबीचा दावा होता.

Read More

मुंबई : =पुण्यापाठोपाठ मुंबईतही जमावबंदी आदेश लागू झाला आहे. मुंबई पोलिसांनी पुढील 9 दिवस कलम 144 लागू केलं आहे. त्यामुळे आता मुंबईत पुढील 9 दिवस सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्रित जण्यास परवानगी नाही. मुंबई पोलिसांकडून आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे आता गणेशोत्सवात कोणत्याही मिरवणुकांना परवानगी नसेल. राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे प्रत्यक्ष मुखदर्शनास प्रतिबंध असल्याने, नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी करू नये अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. भाविकांना आता ऑनलाईनच दर्शन घ्यावे लागणार आहे.

Read More