Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

यावल प्रतिनिधी । यावल तालुक्यातील निमगाव रोडवर अज्ञात दोन जणांनी पोलीस असल्याचे सांगत दुचाकी आडवून वृध्दाच्या हातातील १० ग्रॅमची अंगठी जबरी हिसकावून दुचाकीने पसार झाल्याची घटना घडली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, दिलीप पुरूषोत्तम बऱ्हाटे (वय-६८) रा. पाडळसे ता. यावल हे कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. गुरूवार १३ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता कामाच्या निमित्ताने निमगाव येथे दुचाकीने जात असतांना त्यांच्या मागून अज्ञात दोन जण दुचाकीवरून येवून त्यांची दुचाकी अडविली. आपण दोघे पोलीस असल्याचे सांगत दिलीप बऱ्हाटे यांच्या हातातील १० ग्रॅमची सोन्याची अंगठी जबरी हिसकावून दुचाकीने भुसावळकडे पसार झाले. दिलीप बऱ्हाटे यांनी यावल…

Read More

जळगाव प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील किनोद येथे मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घरातून सोन्याचे दागिने व रोकड असा एकुण १ लाख रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. मंगलेश्वर दिनकर पाटील (वय-३२) रा. किनोद ता. जि.जळगाव हे कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. १२ जानेवारी ते कुटुंबियांसह जेवण करून झोपले असता मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरातील सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकुण १ लाख रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचा प्रकार १३ जानेवारी रोजी सकाळी उघडकीला आला. याप्रकरणी मंगलेश्वर पाटील यांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या…

Read More

जळगाव प्रतिनिधी । आव्हाणे शिवारातील गिरणानदी पात्रातून वाळू उपसा करून शेतातून वाहने जावून न दिल्याने वाळूमाफियांनी शेतकऱ्याला मारहाण केल्याचा प्रकार आज सकाळी घडला. घटनास्थळी नातेवाईकांसह ग्रामस्थांनी धाव घेतल्याने ट्रक्टर चालकांनी नदीपात्रात ट्रॅक्टर सोडून पळ काढला आहे. या मारहाणीत मनोहर चौधरी रा. आव्हाणे ता.जि.जळगाव असे जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, मनोहर चौधरी यांचे गिरणा नदी पात्राच्या काठवर शेत आहे. वाळू माफिया हे गिरणा नदीतून वाळूचा उपसा करून त्यांच्या शेतातून ट्रक्टर व डंपर नेत होते. यामुळे त्यांच्या शेतात रस्ता तयार होत होत. याबाबत शेतकरी मनोहर चौधरी यांनी शेतातून वाहनांना जाण्यास मनाई केली. याबाबत शेतकरी आणि वाळूमाफिया यांच्या वाद…

Read More

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून आलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात २७० जण कोरोना बाधित आढळले आहे. तर १४ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे. जिल्ह्यात आज नव्याने २७० रूग्ण आढळले आहे. यात जळगाव शहर- ६६, जळगाव ग्रामीण-२, भुसावळ-१३७, अमळनेर-०, चोपडा-८, पाचोरा-१०, भडगाव-१, धरणगाव-३, यावल-२, एरंडोल-३, जामनेर-२, रावेर-४, पारोळा-१, चाळीसगाव-१३, मुक्ताईनगर-१४, बोदवड-० आणि इतर जिल्ह्यातील ४ अशी रूग्ण संख्या आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १ लाख ४४ हजार १६२ रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार २९४ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आज दिवसभरात १४ बाधित रूग्ण बरे…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : शिरसोली रोडवरील रायसोनी महाविद्यालयात गुरूवार १३ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता कोविड लसीकरण शिबीर घेण्यात आले. यावेळी अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना कोवीड लस देण्यात आले. कोरोनावर मात करण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने १५ वर्ष वयोगटातील कोरोना लसीकरणाला सुरूवात करण्यात आली आहे. या अनुषंगाने शिरसोली रोडवरील जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालय व शिरसोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या सहकार्याने लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. गेल्या दोन वर्षांपासून महाविद्यालये बंद राहिल्याने विध्यार्थांच्या गुणवत्तेवर परिणत होतांना दिसत आहे. यावर उपाय म्हणुन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे लसीकरण झाले पाहिजे, या उद्देशाने संचालक प्रितम यसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, अकॅडमिक डीन प्रा.…

Read More

जळगाव प्रतिनिधी । सामाजिक कार्यकर्ता दीपक कुमार गुप्ता यांच्यावरील पोलीस संरक्षण कमी करून त्यांना दोन वर्षांकरीता जिल्हा हद्दपार करावा या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया युवक महानगर आघाडी वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीयाचे युवक महानगराध्यक्ष मिलींद सोनवणे यांच्या नेतृत्वात हे निर्दशने करण्यात आले. रिपाइंने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांच्यावर असलेल्या राज्यभरातील गंभीर गुन्ह्यांच्या अनुषंगाने त्यांना देण्यात आलेले पोलीस संरक्षण काढून त्यांना जिल्ह्यातून दोन वर्षांकरीत हद्दपार करावे या मागणीसाठी ७ जानेवारी रोजी पासून रिपाइंचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने साखळी उपोषणाला बसले आहे. परंतू प्रशासनाने…

Read More

जामनेर प्रतिनिधी । गायीच्या गोठ्याचे शेड बांधणीचे प्रकरण मंजूर झाल्यानंतर बांधकामासाठी लागणारी वर्क ऑर्डर काढण्यासाठी ३ हजाराची लाच घेतांना जामनेर पंचायत समितीतील कनिष्ठ लिपीकाला लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे. जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार हे जामनेर तालुक्यातील शेवगे पिंप्री येथील रहिवाशी आहेत. तक्रारदार यांचे गाईचा गोठा शेडचे बांधणीचे प्रकरणी मंजुर झालेले असून गोठ्याचे शेडच्या बांधणीचे काम सुरू करण्यासाठी लागणारी वर्क ऑर्डर मिळवून देण्याच्या मोबदल्यात पंचायत समितीचे कनिष्ठ लिपीक वसंत पंडीत बारी (वय-५३) रा. शेंदुर्णी ता. जामनेर याने तीन हजार रूपयोची मागणी ११ जानेवारी रोजी केली होती. दरम्यान तक्रारदार यांनी जळगाव लाचलुचपत विभागाकडे…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । धरणगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज स्मारक जवळ सभासद नोंदणी अभियान राबविण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरूवातीला राजमाता जिजाऊ व स्वामीवेवेकानंद याच्या जयंती निमित्त त्याचा फोटोला माल्यार्पण करण्यात आले. सभासद नोंदणी अभियानाचे शुभारंभ माजी मंत्री गुलाबरावजी देवकर यांचाहस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख उपस्थितीत माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, पुष्पाताई महाजन, तालुकाध्यक्ष धनराज माळी, युवक तालुका अध्यक्ष नाटेश्वर पवार, युवक शहराध्यक्ष संभाजी धनगर,जेष्ठ नेते मोहन पाटील, कार्याध्यक्ष अरविंद आबा दवरे, सामाजिक न्याय विभाग कल्पना ताई अहिरे, बाजार समिती संचालक रंगराव सावंत, दिलीप अण्णा धनगर, युवक उपाध्यक्ष सागर वाजपेयी, नारायण चौधरी, अमोल हरपे, प्रदीप पाटील, दिनेश भदाणे, लीलाधर…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । जिल्ह्यात कोरोना रूग्ण संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. दरम्यान कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा शिरकाव थेट जळगाव जिल्हा कारागृहात झाला असून १३ कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सर्व कैद्यांची तपासणी केल्यानंतर त्यांना मोहाडी येथील कोवीड रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. जळगाव जिल्ह्यात आज एकुण २८५ बाधित रूग्ण आढळून आले होते. त्यात जळगाव शहर, भुसावळ, चोपडा, चाळीसगाव या ठिकाणी संसर्ग वाढत आहे. जिल्हा कारागृहामध्ये देखील काही कैद्यांना कोरोना आजाराची लक्षणे जाणवत होती. त्यामुळे जिल्हा कारागृह प्रशासनाने त्यांचे नमुने देऊन तपासणी करून घेतली होती. त्यात १३ जणांचा अहवाल सकारात्मक आला आहे.…

Read More

मुक्ताईनगर प्रतिनिधी । घराच्या गच्चीवर बेकायदेशीरित्या बनावट दारू तयार करणाऱ्या तरूणाला पोलीसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून ३६ हजार रूपये किंमतीची दारू हस्तगत केली असून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा येथील एक तरूण विनापरवाना बनावट दारू तयार करून विक्री करत असल्याची गोपनिय माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली. त्यानुसार आज बुधवार १२ जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील सहाय्यक फौजदार अशोक महाजन, सुनील दामोदर, दीपक पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, नंदलाल पाटील, रवींद्र पाटील, सचिन महाजन, अशोक पाटील यांनी…

Read More