Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जुन्या वादातून मुलासह आईला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न ; गुन्हा दाखल !
    क्राईम

    जुन्या वादातून मुलासह आईला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न ; गुन्हा दाखल !

    editor deskBy editor deskJanuary 19, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    शहरातील एका परिसरातील तरुणाला जुन्या वादाच्या कारणावरून व पोलीस स्टेशनला तक्रार दिल्याच्या रागातून तरुणासह आईला चारचाकीची धडक देत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जळगाव शहर पोलीस स्थानकात दोन संशयीताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेली माहिती अशी कि, शहरातील इंद्रप्रस्थ नगरातील रहिवासी असलेल्या अतुल रविद्र सोनवणे हा तरूण दि १८ रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास संशयित आरोपीची जळगाव शहर पोलीस स्थानकात तक्रार देवून आई सोबत दुचाकीवर घरी जात असतांना शिवाजी नगर उड्डाणपूल उतरत असतांना संशयित आरोपी दीपक दगडू भोई व अरविंद शिंदे या दोघांनी त्याच्यामागून चारचाकी क्र.एम.एच.३०ए.एफ.८७३४ पांढऱ्या रंगाची भरधाव वेगात आणत दुचाकीवर असलेले अतुल सोनवणे व आईस जबर धडक देत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणी अतुल सोनवणे यांनी शहर पोलिसात धाव घेत संशयित आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोउनी दत्तात्रय पोटे हे करीत आहेत. या प्रकरणी संशयित आरोपी दीपक भोई यास पोलिसांनी पहाटे ताब्यात घेतले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अपघाताने उध्वस्त झाले प्रेमाचे स्वप्न; नववधू-वर जागीच ठार

    February 22, 2026

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    वकिलावर प्राणघातक हल्ला प्रकरण : तिघांवर गुन्हा दाखल !

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.