Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पतंग उडविताना तोल जाऊन विहिरीत पडला…१० वर्षीय मुलाचा मृत्यू
    अमळनेर

    पतंग उडविताना तोल जाऊन विहिरीत पडला…१० वर्षीय मुलाचा मृत्यू

    editor deskBy editor deskJanuary 15, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव :  प्रतिनिधी 

    तालुक्यातील मूळचे कळमसरे येथील रहिवासी तर सध्या हिंगोणे येथे राहत असलेल्या दहा वर्षाच्या बालकाचा आज पतंग उडवतांना विहिरीत पडल्याने मृत्यू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आज मकर संक्रांती निमित्त सर्वत्र पतंगोत्सव साजरा केला जात आहे. तथापि , यात काळजी न घेतल्यास दुर्घटना घडत असतात . अशीच एक दुर्घटना धरणगाव तालुक्यातील हिंगोणे येथे घडली आहे .

    येथे मूळचे अमळनेर तालुक्यातील रहिवासी असलेले महाजन ( माळी ) कुटुंब उदरनिर्वाहानिमित्त स्थायिक झालेले आहे . याच कुटुंबातील अक्षय संजय महाजन ( माळी ) हा बालक आज पतंग उडवत होता . याप्रसंगी त्याचा तोल जाऊन तो विहिरीत पडला . यामुळे त्याचा मृत्यू झाला . अक्षय माळी हा पाचवीत शिकत असून तो विहिरीत पडल्याचे कळताच परिसरातील लोकांनी धाव घेऊन त्याला बाहेर काढले . मात्र तोवर त्याची प्राणज्योत मालविली होती . यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे . तर हिंगोणे आणि कळमसरे गावावर यामुळे शोककळा पसरली आहे . मुलांनी पतंग उडवतांना सावधगिरी बाळगण्याची गरज असल्याचे यातून पुन्हा एकदा अधोरेखीत झाले आहे .

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अपघाताने उध्वस्त झाले प्रेमाचे स्वप्न; नववधू-वर जागीच ठार

    February 22, 2026

    वकिलावर प्राणघातक हल्ला प्रकरण : तिघांवर गुन्हा दाखल !

    February 22, 2026

    अमळनेरातील डॉक्टराची एक कोटीत फसवणूक !

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.