Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » कौटुंबिक वादातून तिघांनी तरुणाच लिंग कापला ; दोन अटकेत !
    क्राईम

    कौटुंबिक वादातून तिघांनी तरुणाच लिंग कापला ; दोन अटकेत !

    editor deskBy editor deskJanuary 11, 2023Updated:January 11, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    कौटुंबिक वादातून तीन जणांनी धारदार शस्त्रानं तरुणाचं प्रायव्हेट पार्टच कापून टाकल्याचा धक्कादायक प्रकार डोंबिवलीत घडला आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतलं आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमारास डोंबिवली गोळवली परिसरात घडलेल्या एका घटनेनं एकच खळबळ उडाली आहे.

    डोंबिवलीमधील गोळवली परिसरात कौटुंबिक वादातून मोठं भांडण झालं. याच भांडणातून तीन तरुणांनी रागाच्या भरात एका तरुणाचं लिंग कापल्याची घटना घडली. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सोनू राम, करण राम, सुरेंद्र राम या तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पीडित तरुण संजय कुमारला मुंबईतील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. सध्या तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे.
    डोंबिवलीमधील गोलवली परिसरात एका चाळीत संजय कुमार, सोनू राम, करण राम, सुरेंद्र राम हे चार जण एका भाड्याच्या खोलीत राहत होते. हे चौघे मूळचे उत्तरप्रदेश येथील आहेत. हे चारही जण गोळवळी जवळ असलेल्या एमआयडीसीमधील एका कंपनीत काम करत होते. संजय कुमार याचे सोनू, करण, सुरेंद्र यांच्यासोबत कौटुंबिक वाद होते. काल रात्रीच्या सुमारास चौघंही घरी असताना पुन्हा त्यांच्या कौटुंबिक कारणावरून वाद झाला. या वादातून संतापलेल्या सोनू, करण, सुरेंद्र याने संजयकुमार याला बेदम मारहाण केली.

    हे तिघे इथेच थांबले नाही तर त्यांनी सुरेंद्र आणि करण यानं संजयकुमार याला पकडलं आणि सोनूनं धारदार शस्त्रानं संजयकुमार यांचं लिंग कापलं. गंभीर जखमी झालेल्या संजयकुमार याला करण आणि सोनुनं रुग्णालयात दाखल केलं. मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्याला मुंबई येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात सोनू, करण, सुरेंद्र हा तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना ताब्यात घेतलं असून पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.