Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धरणगावची पाणी समस्या सुटणार ; शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट !
    धरणगाव

    धरणगावची पाणी समस्या सुटणार ; शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट !

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJanuary 4, 2023Updated:January 4, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वात पदाधिकाऱ्यांने दिले निवेदन

    धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील विविध विकास कामांसह वडा नदी पात्रासह धरणगावपर्यंत नवीन पाईप लाईनसाठी निधी मिळावा, या मागणीसाठी आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांना पत्र देत निधीची मागणी करण्यात आली. यामुळे धरणगावची पाणी समस्या कायमची सुटून धरणगावच्या विकासामध्ये मोठी भर पडणार आहे.

    मिळालेली माहिती अशी की, धरणगाव शहरातील विविध विकास कामांसाठी तसेच गुळ नदी प्रकल्प ते धावडा नदी पात्रात पाण्याचे आवर्तन घेत असतांना मोकळ्या पत्रातून घेतले जात होते. यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत होता. त्यामुळे याठिकाणी बंदिस्त पाणी टाकल्यास पाण्याची बचत होईल. तर दुसरीकडे धावडा ते धरणगावपर्यंतची पाईप लाईन जुनी झाली असल्यामुळे सतत गळती होत असते. त्यामुळे देखील पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होत असते. यामुळेच या दोघं कामांसाठी 55 कोटींच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवेदन स्वीकारत लवकरच निधी देण्याची मान्य केले आहे. यावेळी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, पालिका गटनेते विनय (पप्पू) भावे, मोतीआप्पा पाटील, विलास महाजन, वाल्मीक पाटील, शिवराज पाटील, प्रशांत देशमुख यांच्यासह आदी उपस्थित होते. दरम्यान, धरणगावची पाणी समस्या कायमची सुटणार पेच धरणगावच्या विकासामध्ये मोठी भर पडणार आहे. प्रशांत देशमुख यांच्यासह आदी उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    महाराष्ट्रात गॅस टंचाईचा अलर्ट: उद्योग आणि हॉटेल व्यवसाय ठप्प!

    March 10, 2026

    बारामती विमान दुर्घटना प्रकरण तापले; कंपनी मालकाची चौकशी, घातपाताचाही संशय

    March 10, 2026

    युद्धाच्या पार्श्वभूमीवरही सोन्याला ब्रेक; जळगावात दर १५०० रुपयांनी घसरले

    March 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.