Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पाळधीतील स. न. झंवर विद्यालयात ‘सेवा संकल्प अभियान’चा शुभारंभ
    धरणगाव

    पाळधीतील स. न. झंवर विद्यालयात ‘सेवा संकल्प अभियान’चा शुभारंभ

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रSeptember 22, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पाळधी : भारतीय जनता पक्ष पाळधी मंडळाच्या वतीने १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ‘सेवा संकल्प अभियानाला’ स. न. झंवर विद्यालय, पाळधी येथे उत्साहात सुरुवात झाली. अभियानाच्या प्रारंभी किशोरवयीन विद्यार्थ्यांसाठी व्यसनमुक्ती, कॅन्सर प्रतिबंध आणि आरोग्यविषयक जनजागृतीपर मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला.

    उत्तर महाराष्ट्रातील प्रख्यात कॅन्सरतज्ज्ञ डॉ. निलेश चांडक यांनी विद्यार्थ्यांना व्यसनांचे दुष्परिणाम, कॅन्सरपासून बचावासाठी घ्यावयाची काळजी तसेच आरोग्यदायी जीवनशैली याबाबत सखोल मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी रासायनिक घटकांचा वापर कमी असलेल्या अन्नाबाबतही विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि उपस्थितांमध्ये जनजागृती केली.

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील भाऊ झंवर यांनी केले. १७ ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या सेवा संकल्प अभियानात विद्यालयाचा जास्तीत जास्त सहभाग राहील, असे त्यांनी सांगितले.

    यावेळी भाजपा वैद्यकीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन वसंतराव पाटील, तालुकाध्यक्ष किशोर झंवर, पाळधी शहरप्रमुख संदेश झंवर, प्रफुल सोमानी, चेतन झंवर यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील भाऊ झंवर, मुख्याध्यापक पाटील सर, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

    कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भदाणे सर, होले सर, साळुंखे सर, बसेर मॅडम, निकम मॅडम आणि बिर्ला मॅडम यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ननवरे सर यांनी केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    पाळधीत शेतात पाणी भरताना विजेचा जीवघेणा धक्का; कर्त्या तरुणाचा मृत्यू

    September 7, 2026

    आनंदाची बातमी : ‘या’ एक्सप्रेसला मिळाला धरणगाव येथे थांबा !

    September 4, 2026

    धरणगावात महसूल विभागाची धडक कारवाई; १० ते १२ बेवारस वाळूसाठे जप्त

    August 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.