Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » काय सांगता ; ट्विटरचे ४५ हजार खाती केले बंद !
    राष्ट्रीय

    काय सांगता ; ट्विटरचे ४५ हजार खाती केले बंद !

    editor deskBy editor deskJanuary 2, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

    देशात गेल्या काही दिवसाआधी ट्विटर काही काळ बंद पडलेले होते. त्यानंतर नेटकऱ्यानी सोशल मिडीयावर एलॉन मस्क यांना ट्रोल केले जात होते. तर नुकतेच मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरने देशात 45 हजार 589 ट्विटर खात्यांवर बंदी घातली आहे. यामध्ये मुलांचे लैंगिक शोषण, नग्नता आणि संबंधित पोस्ट केल्या जात असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. तसेच ही खाती 26 ऑगस्ट ते 25 सप्टेंबर दरम्यान बंद करण्यात आली आहेत. ट्विटरने दहशतवादाचे समर्थन करणाऱ्या 3035 खात्यांवरही कारवाई केली आहे. ट्विटरने भारतात एकूण 48 हजार 624 खात्यांवर बंदी घातली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरवणाऱ्या आणि भावना भडकवणाऱ्या पोस्टला आळा बसावा, या करता ट्विटरने हा निर्णय घेतला आहे.

    ट्विटरने या महिन्याचा मासिक अहवाल जाहीर केला आहे. रिपोर्टमध्ये ट्विटरने म्हटले आहे की, ट्विटर यूजर्सकडून 755 तक्रारी आल्या होत्या. त्यापैकी 121 यूआरएलवर कारवाई करण्यात आली आहे. यूजर्सने केलेल्या सर्व तक्रारींचे निराकरण झाल्याचे कंपनीने म्हटले आहे. याशिवाय, आवश्यक प्रतिसाद देखील आम्ही तक्रारदारांना पाठवला आहे.

    का ब्लॉक करण्यात आले खाते ?
    मिळालेल्या माहितीनुसार, यात चुकीची माहिती असलेल्या बातम्या आणि धार्मिक समुदायांमध्ये द्वेष पसरवण्याच्या उद्देशाने मॉर्फ केलेल्या व्हिडीओंचा समाविष्ट आहेत. तसेच यात धार्मिक समुदायांविरुद्ध हिंसक धमक्या देण्यात आल्या आहेत. तसेच अशा व्हिडीओंमध्ये जातीय तेढ निर्माण करण्याची आणि देशातील सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवण्याची क्षमता असल्याचे आढळून आले आहे.
    ट्विटरचे नवे मालक एलॉन मस्क यांनी ट्विटरकडून नवीन धोरणाची घोषणा केली होती. मस्क यांनी स्पष्ट केले होते की, आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अजिबात विरोधात नाही, मात्र आता ट्विटरवर नकारात्मक आणि भडकाऊ ट्विट करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. ट्विटरच्या नवीन धोरणात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, परंतु अशा प्रकारच्या ट्विटचे स्वातंत्र्य नाही. मस्क म्हणाले, नकारात्मक/द्वेषपूर्ण ट्विट जास्तीत जास्त डीबूस्ट केले जातील आणि डिमोनेटाईझ केली जाईल. अशा ट्विट्सना Twitter वर कोणतीही जाहिरात किंवा कमाईचे साधन उपलब्ध असणार नाही.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    कालीचरण महाराजांचा धक्कादायक विधान : गुन्हे सिद्ध झाले तर भर चौकात गोळी मारली पाहिजे !

    March 22, 2026

    नंदगाव वीज उपकेंद्राचे लोकार्पण; दिलेला शब्द पूर्ण ; पालकमंत्री पाटील !

    March 21, 2026

    भोंदू खरात प्रकरणाचा राजकीय आवाज: सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्ताधाऱ्यांवर थेट आरोप

    March 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.