Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अभिनेत्री कंगना रनौत अडकणार वादात ; स्वतःची केली तुलना !
    राष्ट्रीय

    अभिनेत्री कंगना रनौत अडकणार वादात ; स्वतःची केली तुलना !

    editor deskBy editor deskDecember 23, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    बॉलिवूडमधील कंगना रनौत नेहमी आपल्या वेगवेगळ्या वक्तव्यामूळं चर्चेत असतं. कंगणा कधी कूणाबद्दल काय बोलेल याचा भरोसा नाही. कधी ती कुणाला झाडते तर कधी कुणाच्या कौतुकाचा वर्षाव करते. आता तर तिने काही वेगळंच केलयं. तिने तिची तुलना चक्क भारतरत्न लता मंगेशकर यांच्याशीच स्वत:ची तुलना केली आहे. यामुळे नेटकऱ्यानी रनौतला चांगलेच फटकारले आहे.

    कंगना राणौतने नुकताच इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये गायिका आशा भोसले दिवंगत गायिका लता मंगेशकर यांच्याबद्दल बोलत आहेत. व्हिडीओमध्ये आशा भोसले सांगत आहेत की, लता मंगेशकर कधीही लग्नसमारंभात गात नाही गायच्या. त्यांना कितीही पैसे देऊ केले तरी त्या लग्नात कधीच गायच्या नाहीत. हा व्हिडिओ शेअर करताना कंगना राणौतने सांगितले की, ती देखील असेच करते. कंगनाने शेअर केलेल्या या व्हिडिओत डान्स इंडिया डान्स लिल मास्टरच्या स्टेजवरचा आहे. ज्यामध्ये आशा भोसले सहभागी झाल्या होत्या. लतादीदींनी एकदा लग्नात दोन तासांच्या परफॉर्मन्ससाठी एक मिलीयन डॉलर्सची ऑफर त्यांनी कशी नाकारली हे त्यांनी सांगितले. या घटनेची आठवण करून देताना आशा म्हणाल्या, “तिला 5 मिलियन डॉलर्सची ऑफरही आली होती, तेही ऑफरही ती नाकारायची. ते कलाकारामध्ये असलं पाहिजे.”

     

    https://www.instagram.com/reel/CmdiihpgdbZ/?utm_source=ig_embed&ig_rid=7bfeb44f-840f-4e2e-a61f-1ab0876869d8

    व्हिडिओ शेअर करताना कंगनाने लिहिले, “याच्याशी सहमत! माझ्याकडे सर्वाधिक लोकप्रिय गाणी असूनही मी लग्न किंवा एखाद्या खाजगी पार्ट्यांमध्ये कधीही नाचले नाही. मोठी रक्कमेलाही नाही म्हटलं. व्हिडिओ पाहून आनंद झाला. लताजी खरंच खूप प्रेरणादायी आहेत.” कंगना 2023 मध्ये ‘इमर्जन्सी’ चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय कंगना ‘तेजस’ चित्रपटातही दिसणार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    नंदगाव वीज उपकेंद्राचे लोकार्पण; दिलेला शब्द पूर्ण ; पालकमंत्री पाटील !

    March 21, 2026

    भोंदू खरात प्रकरणाचा राजकीय आवाज: सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्ताधाऱ्यांवर थेट आरोप

    March 21, 2026

    अखेर रुपाली चाकणकरांनी सोपविला उपमुख्यमंत्री पवारांकडे राजीनामा !

    March 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.