Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » वेगवेगळ्या ठिकाणी दोन मुलीवर अत्याचार ; आरोपींना घेतले ताब्यात !
    क्राईम

    वेगवेगळ्या ठिकाणी दोन मुलीवर अत्याचार ; आरोपींना घेतले ताब्यात !

    editor deskBy editor deskDecember 21, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    औरंगाबाद : वृत्तसंस्था 

    औरंगाबाद शहराजवळ असलेल्या वाळूज परिसरात दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
    मागील तीन दिवसांत अत्याचाराच्या दोन घटना घडल्यामुळे मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. घडलेल्या या घडनेमुळे पालकवर्गामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेत एका दहावीत शिकणाऱ्या मुलीला ढाब्यावर नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला तर, दुसऱ्या मुलीवर तिच्या घराच्या मागच्या बाजूला नेऊन अत्याचार करण्यात आल्याचे समोर आले आहे.
    या प्रकरणी वाळूज पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. मात्र, तीन दिवसात दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना घडल्याने शहरात पोलिसांचा वचक आहे की नाही असा प्रश्न पालक आणि नागरिकांकडून उपस्थित केला जात असून, आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा देण्याची मागणी पालकांकडून केली जात आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सिडको वाळूज महानगर येथील पिडीत 17 वर्षीय विद्यार्थीनी सोमवारी (ता.19) रोजी सकाळी 7.30 वाजता शाळेत जाणेसाठी घरातून निघाली. ती शाळेच्या गेटजवळ पोहचली. तेव्हा अंदाजे 8 वाजता तिच्या परिचयाचा मित्र शिव चौधरी, रा. बजाजनगर हा त्याचे शाईन मोटार सायकलवर उभा होता. त्याने पीडित मुलीला बोलावून सांगीतले की, चल आज आपण माझ्या मोटार सायकलवर दोघे फीरून येवू. तेव्हा तिने त्यास माझी शाळा आहे, मी येत नाही.
    तु मला फिरण्याचा बहाणा करून मागे सुध्दा माझ्यासोबत घाणेरडे प्रकार केले होते. मी येत नाही, असे म्हणाली. परंतु आरोपी शिव चौधरी याने तीला परत परत सांगून त्याचे शाईन मोटार सायकलवर बसविले. व खुलताबाद येथील एका धाब्यासारखे हॉटेलवर घेवून गेला. तेथे एका रूममधे तीला घेवून जावून त्याने तिच्यासोबत ईच्छेविरूध्द जबरदस्तीने शारीरीक संबंध केले. त्यास नको नको म्हणून विद्यार्थिनीने बराच विरोध केला. परंतु त्याने तिचे काहीही ऐकले नाही. त्यानंतर आरोपीने मोटार सायकलवर बसवून परत बजाजनगर येथे शाळेच्या गेटजवळ दुपारी 1 वाजता सोडले. त्यानंतर पीडित विद्यार्थिनी घरी गेली, तेव्हा ती शाळेत गेली नसल्याचे घरच्यांना व नातेवाईकांना समजले होते. त्यामुळे त्यांनी तीला विश्वासात घेवून विचारपूस केली असता घडलेला प्रकार समोर आला. याप्रकरणी पीडित विद्यार्थिनीच्या फिर्यादीवरून आरोपी शिव चौधरी यांच्या विरुद्ध वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    गुप्त माहितीनंतर शनिपेठ पोलिसांची धाड; बेकायदेशीर मांस विक्रीचा भंडाफोड !

    April 27, 2026

    कन्नड घाटात वळणावर कार घसरली; पोलीस अंमलदारासह चौघे जखमी

    April 27, 2026

    हळदी समारंभात धक्क्यावरून रक्तरंजित थरार; कोयत्याने डोक्यावर वार, तिघे फरार

    April 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.