Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगाव एका तरुणाचा खून तर दोन जखमी !
    क्राईम

    जळगाव एका तरुणाचा खून तर दोन जखमी !

    editor deskBy editor deskDecember 20, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    जळगाव शहरातील जुने बसस्थानक परिसरात किरकोळ वादातून दोन जणांनी एकाला चाकूने भोसकून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी २० डिसेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. आकाश सुरेश सपकाळे उर्फ धडकन (वय-३०) रा. कोळी पेठ, जैनाबाद जळगाव असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. ज्या तरुणांनी याच्यावर हल्ला केले ते घटनास्थळाहून फरार झाले होते. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ.दीपक जाधव यांनी मयत घोषित केले.

    यामध्ये इतर दोन जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. शहरातील जुने बसस्थानक येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन गटात तुफान हाणमारी होऊन धारदार शस्त्राने सपासप वार करून आकाश सुरेश सपकाळे रा. कोळी पेठ, जैनाबाद जळगाव तरुणाचा निर्घृणपणे खून केला. यामध्ये मयताचा भाऊ सागर सुरेश सपकाळे आणि सागर आनंदा सपकाळे हे दोन जण जखमी झाले आहे. जखमींना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय ठाकुरवाड, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे यांच्यासह जिल्हापेठ व शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनांसाठी दाखल झाले आहे. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांसह मित्रपरिवाराची प्रचंड गर्दी झाली होती.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अपघाताने उध्वस्त झाले प्रेमाचे स्वप्न; नववधू-वर जागीच ठार

    February 22, 2026

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    वकिलावर प्राणघातक हल्ला प्रकरण : तिघांवर गुन्हा दाखल !

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.