Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पोटच्या लेकाने आपल्याच जन्मदात्या बापाचा घेतला जीव !
    क्राईम

    पोटच्या लेकाने आपल्याच जन्मदात्या बापाचा घेतला जीव !

    editor deskBy editor deskDecember 17, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    औरंगाबाद : वृत्तसंस्था

    राज्यातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत चालेली आहे रागाच्या भरात कोण काय करेल हे कुणीही सांगू शकत नाही. औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील बिडकीन गावात एक धक्कादायक घटना समोर आली असून, पोटच्या लेकाने आपल्याच जन्मदात्या बापाचा जीव घेतला आहे. वडिलांच्या छातीवर बसून केलेल्या बेदम मारहाणीत वडिलांचा जागीच मृत्यू आहे. तर परिसरातील नागरिकांनी याबाबत माहिती मिळताच आरोपी मुलाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. अशरफ खॉन आमीन खॉन (वय 65 वर्षे) असे मृत व्यक्तीचे नाव असून, असद अशरफ खॉन (वय 35 वर्षे) असे बापाचा जीव घेणाऱ्या आरोपी मुलाचे नाव आहे.

    याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बिडकीन गावातील आझाद चौकात राहणारे अशरफ खॉन यांच्यावर काही दिवसांपूर्वी मोठी शस्त्रक्रिया झाल्याने ते सद्या आजारी होते. त्यामुळे ते घरातच आराम करत होते. दरम्यान आज दुपारच्या सुमारास त्यांचा मुलगा असद खॉन यांनी अचानक आपल्या वडिलांना मारहाण सुरु केली. मात्र आधीच आजारी असल्याने आणि मुलाने केलेल्या बेदम मारहाणीत अशरफ यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर आरोपी असदला बिडकीन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

    याबाबत परिसरातील घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, असदने सुरवातीला आपल्या वडिलांना आतल्या खोलीत मारहाण केली. त्यानंतर पुढच्या घरातील दरवाज्यात पाय धरून ओढत आणले. एवढ्यावर न थांबता वडिलांच्या छातीवर बसून त्यांना बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. आधीच शस्त्रक्रिया झालेली असल्याने अशरफ खॉन यांनी जागीच जीव सोडला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपी असद आपल्या वडिलांच्या छातीवर बसून मारहाण करत असल्याची माहिती गल्लीतील काही नागरिकांना कळाली. त्यामुळे नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी असद आपल्या वडिलांच्या छातीवर बसून मारहाण करत असल्याचे दिसल्याने नागरिकांनी त्याला पकडून बाजूला केले. तसेच पोलिसांना याची माहिती देऊन त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. तर जखमी अशरफ यांना तात्काळ बिडकीन येथील शासकीय घाटी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषीत केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    गुप्त माहितीनंतर शनिपेठ पोलिसांची धाड; बेकायदेशीर मांस विक्रीचा भंडाफोड !

    April 27, 2026

    कन्नड घाटात वळणावर कार घसरली; पोलीस अंमलदारासह चौघे जखमी

    April 27, 2026

    हळदी समारंभात धक्क्यावरून रक्तरंजित थरार; कोयत्याने डोक्यावर वार, तिघे फरार

    April 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.