Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » सीमावाद प्रकरणातील मास्टरमाइंड शोधा ; पवारांची मागणी !
    क्राईम

    सीमावाद प्रकरणातील मास्टरमाइंड शोधा ; पवारांची मागणी !

    editor deskBy editor deskDecember 15, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मईंनी वारंवार वक्तव्ये करून महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावण्याचे काम केल्याचा घणाघातही त्यांनी केला. सीमाभागामध्ये शांततापूर्ण वातावरण निर्माण करण्यासाठी दोन्ही राज्यांनी दिल्लीत ठरवल्याप्रमाणे वागले पाहिजे. सीमावादाच्या आंदोलनामागचा मास्टरमाइंड शोधावा, अशी मागणी गुरुवारी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुंबईत केली आहे.

    अजित पवार म्हणाले की, सीमावाद पेटवणारा सूत्रधार कोण आहे, हे का घडले, असा विरोध का आणि आंदोलन का झाले? यात जाणीपूर्वक कोणी ट्विटवर बातम्या सोडल्या आणि त्यातून लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या. या भावनांचा उद्रेक झाला. उद्रेक होऊन या सगळ्या गोष्टी घडल्या, हे सारे समोर आले पाहिजे. आता काही जणांना असे वाटते की, हे कोणीतरी विरोधकांनी केले. अशी संशयाची सुई घेतली जाते. मात्र, यात तथ्य नसल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही कधीही राज्याच्या आणि देशाच्या एकसंधतेला धक्का लागणार नाही, कुठलिही चुकीची गोष्ट आम्हा लोकांकडून कदापिही घडणार नाही. हा सातत्याने दृष्टिकोन आम्ही वेगवेगळे राजकीय पक्ष ठेवत असतो, तरी पण कुठली शंका-कुशंका केंद्र सरकारला वाटत असेल, दोन राज्यातल्या प्रमुखांना वाटत असेल, तर त्यातले दूध का दूध आणि पानी का पानी पुढे आले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

    अजित पवार पुढे म्हणाले की, कशामुळे हे निर्माण झाले. सगळे सुरळित सुरू होते. यामागचा मास्टरमाइंड कोण आहे? बोम्मई साहेबांनी तशा प्रकारचे स्टेटमेंट केले नसते, तर बरे झाले असते. आपण राज्याची निर्मिती झाल्यापासून निपाणी, बेळगाव कारवार मागतोय. त्यांनी त्यासंबंधी वक्तव्य केले. नंतर जत संबंधी वक्तव्य केले. त्यातून बोम्मई महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावण्याचे काम करतायत. अशी भावना महाराष्ट्र वासियांच्या आणि सीमावासीयांच्या मनामध्ये निर्माण झाली. त्यामुळे हे सारे घडले. कर्नाटक सीमावादासंदर्भात अनेकदा समित्या नेमल्या गेल्या. अनेकदा आंदोलने झाली. अनेकदा चर्चा झाल्या. मला आठवतेय पाठीमागच्या काळात वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांनी बैठका घेतल्या. मात्र,आता राज्य सरकारने आक्रमक होत खमकेपणाने भूमिका मांडावी. महाराष्ट्राच्या बाजून वकील म्हणून हरीश साळवे यांची नियुक्ती करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.