Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धक्कादायक : मित्रावर अनैसर्गिक अत्याचार करीत व्हीडीओ केला व्हायरल !
    क्राईम

    धक्कादायक : मित्रावर अनैसर्गिक अत्याचार करीत व्हीडीओ केला व्हायरल !

    editor deskBy editor deskDecember 15, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमरावती : वृत्तसंस्था 

    मित्र एकत्र आले कि कोणती मस्करी करीत हे सांगता येत नसते पण कधी कधी हि मस्करी सुद्धा खूप महागात पडत असते. ज्यामधून एखाद्या मित्राला त्रास होवून दुर्देवी घटना हि घडू शकते अशीच एक धक्कादायक घटना अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथे घडल्याने मैत्री या गोड शब्दाला काळिमा फासला गेला आहे.

    तीन मित्र एकत्र येत मस्करी सुरु असतांना एकाने आरोपीने अचानक आपल्या सोबत असलेल्या मित्रावरच अनैसर्गिक अत्याचार केला. धक्कादायक म्हणजे दुसऱ्या एका मित्राने या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड करुन सोशल मीडियावर व्हायरल केला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पीडित तरुणाच्या तक्रारीवरुन दोन जणआंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    27 वर्षीय वासनांध तरूणाने 19 वर्षीय तरूण मित्राला दारू पाजून त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील बाभळी परिसरात घडली. तिथं उपस्थित तिसऱ्या मित्राने त्या अनैसर्गिक शरीरसंबंधाचे मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग केलं. इतक्यावरच हे आरोपी थांबले नाहीत, त्यांनी हा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल देखील करण्यात आला. त्या व्हायरल व्हिडिओची दखल घेत दर्यापूर पोलिसांनी 3 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. अत्याचाराचा हा व्हिडिओ व्हॉट्सअॅपवर शेअर करण्यात आला. बघता बघता हा शेकडो लोकांपर्यंत व्हिडिओ फॉरवर्ड झाला. त्यामुळे त्या तरुणांची मोठ्या प्रमाणावर बदनामी झाली असून पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. मित्रानेच मित्रावर केलेल्या अत्याचाराच्या या धक्कादायक घटनेची चर्चा संपुर्ण दर्यापुरात होत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    गुप्त माहितीनंतर शनिपेठ पोलिसांची धाड; बेकायदेशीर मांस विक्रीचा भंडाफोड !

    April 27, 2026

    कन्नड घाटात वळणावर कार घसरली; पोलीस अंमलदारासह चौघे जखमी

    April 27, 2026

    हळदी समारंभात धक्क्यावरून रक्तरंजित थरार; कोयत्याने डोक्यावर वार, तिघे फरार

    April 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.