Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » बसचा विचित्र अपघात ; सहा ठार !
    क्राईम

    बसचा विचित्र अपघात ; सहा ठार !

    editor deskBy editor deskDecember 8, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नाशिक : वृत्तसंस्था

    नाशिक – पुणे महामार्गावर शिंदे पळसे टोल नाक्यावर भीषण अपघात झाला. यात एसटी बसने दोन वाहनांना धडक दिली. या अपघातात सहा  जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे. तर अपघातानंतर एस टी बसने पेट असल्याने जळून खाक झाली आहे. कार चालक अचानक थांबल्याने दोन एसटी कारवर धडकल्याचे प्राथमिक माहिती आहे. त्यात दोन ते तीन बाईकमध्ये अडकल्या.अपघातानंतर बसने पेट घेतला. पेट घेतलेली एसटी राजगुरू नगर आगाराची असल्याचे समजते आहे.

    नाशिकच्या औरंगाबाद चौफुलीवर घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती पुन्हा एकदा नाशिक शहरात घडली आहे. नाशिक-पुणे महामार्गावर भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून शिंदे पळसे टोल नाका परिसरात दोन तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. या अपघातानंतर बसने पेट घेतला आहे. या भयंकर अपघातात दोन ते तीन जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून अपघात झाल्यानंतर काही क्षणातच एसटी बस आगीत भस्मसात झाली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामन दल घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे काम सुरू आहे.

    दरम्यान या ठिकाणी बघायची मोठी गर्दी जमली आहे सद्यस्थितीत हा अपघात नेमका कसा झाला याचे कारण अद्याप स्पष्ट असून यंत्रणेसह इतर प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. काही दिवसांपूर्वी औरंगाबाद महामार्गावर नांदूर नाका जवळील मिरची हॉटेल चौकात देखील असाच अपघात घडला होता. ट्रकने खाजगी बसला धडक दिली होती. अपघात झाल्यानंतर काही क्षणातच खाजगी बसने पेट घेतल्याने या 13 लोकांचा मृत्यू झाला होता. दरम्यान सिन्नर नाशिक महामार्गावर देखील असाच भीषण अपघात झाला असून या दोन ते तीन जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा त्या अपघाताची पुनरावृत्ती झाल्याचे प्रत्यक्ष दर्शनी सांगितले. यात महामंडळाच्या एसटी बसचा कागदासारखा पेट घेतला असून तात्काळ लोकांच्या सावधगिरीमुळे मोठा अनर्थ टळला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.