Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » लखपती व्हायचे हि योजना करा सुरु !
    राज्य

    लखपती व्हायचे हि योजना करा सुरु !

    editor deskBy editor deskDecember 5, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    आपण नेहमी कमी वेळेत लखपती कसे होणार याकडे आकर्षित असतो पण आपण जर बचत केलीच नाही तर कसे लखपती होणार ? यासाठी एक उत्तम योजना आलीय ज्याने तुमचे स्वप्न साकार होणार. अल्पबचत योजना सुरक्षित गुंतवणुकीचा पर्यायच देत नाही तर उत्तम परताव्याची हमी पण देतात. या गुंतवणूक योजनेत तुम्ही पद्धतशीर गुंतवणूक योजनेसारखी (SIP) गुंतवणूक करु शकतात. ही गुंतवणूक दरमहा केल्यास तुम्हाला काही वर्षानंतर जोरदार परतावा मिळतो. पब्लिक प्रोव्हिडंड फंडमध्ये (PPF) केलेली गुंतवणूक तुम्हाला मालामाल करते.

    पीपीएफ योजनेचे खाते तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये उघडू शकता. या योजनेत व्याजदर हा इतर बचत योजनांमपेक्षा अधिक मिळते. ही योजना दीर्घकालीन उद्दिष्ट गाठण्यासाठी अत्यंत उपयोगी ठरते. त्यामुळे अनेक गुंतवणूकदार पीपीएफ योजनेत गुंतवणूक करतात.

    एका आर्थिक वर्षात या योजनेत जास्तीत जास्त 1.50 लाख रुपयांची गुंतवणूक करता येते. तर कमीत कमी 500 रुपये गुंतविता येतात. जर तुम्हाला अधिक परतावा हवा असेल तर दर महा 12500 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.

    पब्लिक प्रोव्हिडंट फंडमध्ये दीर्घकालीन गुंतवणूकदाराला मोठा फायदा मिळतो. 15 वर्षांच्या कालावधीसाठी या योजनेतील गुंतवणूक चांगला परतावा देते. या सरकारी योजनेत गुंतवणुकीवर हमीपात्र परतावा मिळतो. सध्या या योजनेत 7.1 टक्के वार्षिक व्याज मिळते.

    PPF योजनेवर 7.1 टक्के वार्षिक व्याज मिळते. कित्येक बँकांच्या मुदत ठेवीवरील व्याजापेक्षा हा दर जास्त आहे. यामध्ये कंम्पाऊंडिंगचा फायदा मिळते. या योजनेत सिंगल अकाऊंट खाते उघडण्याची सोय आहे. लहान मुलांच्या नावे पण खाते उघडता येते.

    पीपीएफ खात्यात 15 वर्षांपर्यंत गुंतवणूक करता येते. पण तुम्हाला हा कालावधी 5-5 वर्षांसाठी वाढविता येतो. या योजनेतील गुंतवणूक ही कर सवलत पात्र असते. तुम्हाला कर सूट मिळविता येते. एवढंच नाही तर खात्याला एक वर्ष झाल्यानंतर तुम्हाला कर्ज सुद्ध मिळविता येते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    “डॉलरचे पार्सल” ठरले सापळा; भीती आणि आमिषाने ३.४७ लाखांची ऑनलाईन लूट

    April 21, 2026

    बीडमध्ये धक्कादायक प्रकार; सावत्र मुलासोबत महिला फरार

    April 20, 2026

    भाजपचे एक ‘दोन फुटांचा’ नेता ; सुजात आंबेडकरांचा हल्लाबोल !

    April 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.