Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » कृषीमंत्र्यांकडून  जामनेर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी
    जामनेर

    कृषीमंत्र्यांकडून  जामनेर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रSeptember 11, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    कृषी मंत्री भुसेंची संवेदनशीलता

    लाईव्ह महाराष्ट्र: ढगफुटीमुळे जामनेर तालुक्यात शेतीचे मोठे नुकसान झाले होते याच वादळी पावसात घरावरील पत्रे उडून बैल जखमी झाला होता. या बैलाला पशुवैद्यकांनी 30 टाके घालून त्याचे प्राण वाचविले.  त्याला पाहणी कृषिमंत्री दादा भुसे थेट शेतकऱ्याच्या घरी झाले त्याला आश्वासन दिले की बैलाच्या उपचारावर होणारा खर्च शासन करेल असेही त्यांनी सांगितले.

    ढगफुटीसारख्या नैसर्गीक आपत्तीमुळे शेतातील पिकांचे होणारे नुकसान दुर्दैवी बाब आहे. शेतक-र्यांना त्यांच्या पीक विम्याचा मोबदला तातडीने मिळावा यासाठी कृषी व महसुल विभागाने सहकार्य करण्याच्या सुचना कृषी मंत्री दादा भुसे यांनी  दिल्यात.

    मंत्री दादा भुसे यांनी आज जामनेर तालुक्यातील ओझर, हिंगणे व सामरोद शिवारातील पिकांच्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर शेतक-र्यांशी संवाद साधला.
            
    जामनेर तालुक्यातील काही गावात चार दिवसापूर्वी झालेल्या चक्री वादळामुळे शेतीचे व घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत. ओझर येथे घरावरील पत्रा उडून बैलावर पडल्याने बैल गंभीर जखमी झाला होता. मंत्री भुसे व आमदार किशोर पाटील यांनी आज  बैल मालक शेतकरी रमेश भगवान माळी यांचे घर गाठले. तेथे त्यांनी या बैलाच्या प्रकृतीची माहिती शेतकरी श्री. माळी यांच्याकडून घेतली. तसेच या बैलाच्या उपचाराचा सर्व खर्च शासनाच्या माध्यमातून करण्यात येईल, असे मंत्री दादा भुसे यांनी सांगत शेतकरी माळी यांना दिलासा दिला.
    यावेळी मंत्री दादा भुसे यांनी तहसीलदार अरुण शेवाळे, तालुका कृषी अधिकारी ए बी चोपडे यांना नुकसानीचे पंचनामे, तातडीची मदत व पिक विम्याबाबत सुचनाही दिल्यात.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    जामनेर : १६ वर्षीय मुलीचा विनयभंग : एका विरोधात गुन्हा दाखल !

    April 21, 2026

    चक्कर येऊन तरुणाचा मृत्यू; मंदिर परिसरात घडली हृदयद्रावक घटना

    April 13, 2026

    खळबळजनक : शाळकरी मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू !

    March 29, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.