Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » . डंपर मागे घेताना भीषण अपघात; रस्त्यावर काम करणाऱ्या मजुराचा जागीच जीव गेला!
    क्राईम

    . डंपर मागे घेताना भीषण अपघात; रस्त्यावर काम करणाऱ्या मजुराचा जागीच जीव गेला!

    editor deskBy editor deskOctober 30, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जामनेर : प्रतिनिधी 

    तालुक्यातील फत्तेपूर येथे गेल्या कित्येक दिवसांपासून बोदवड फत्तेपूर राज्य मार्ग ४६ या रस्त्याचे काम कासवगतीने सुरु आहे. रांजणी बेटावद रस्त्यावर ढंपर मागे घेत असतांना रस्त्यावर काम करणाच्या परप्रांतीय मजुराला जोरदार धडक बसल्याने त्याचा जागीच मृत्य झाल्याची घटना दि. २६ रोजी रात्री आठ वाजेचे सुमारास घडली. राजनी बेटावद रस्त्यादरम्यान या कंपनीचा कॅम्प आहे. तेथून एक किमी अंतरावर रांजणी गावाकडे ढंपर (एमएच. ०५ जी.ए.३०६५) मागे घेत असतांना चालकाने रस्त्यावर काम करणाऱ्या संतोषकुमार हरिनंदनसिंह (वय .३९ रा. परसागढी जि. सुपौल बिहार) या परप्रांतीय मजुराला जोरदार धडक दिली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

    याबाबत अवधेश गोनर पासवान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ढंपर चालक आकाश प्रल्हाद चोभे (रा. सारगाव ता. जामनेर) याचे विरुद्ध फत्तेपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पुढील तपास सपोनि अंकुश जाधव यांचे मार्गर्शना खाली हेड काँ. गणी तडवी पोकॉ मुकेश पाटील करत आहेत. शवविच्छेदनानंतर मृतदेह बिहारमधील मृताच्या मूळगावी अंत्यसंस्कारासाठी पाठविण्यात आला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मकरा फटाक्यांसमोर मृत्यूचा थरार : डंपर-ट्रकची भीषण धडक; एकाचा बळी, दुसरा गंभीर जखमी!

    October 30, 2026

    उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येणार ? शिंदेंच्या नेत्याचे मोठे विधान !

    October 30, 2026

    भुसावळातील शिक्षकांच्या पतपेढीत आर्थिक गैरव्यवहाराचा पर्दाफाश; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल!

    October 30, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.