Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मका काढताना घडली दुर्घटना : ३७ वर्षीय योगेश पाटील यांचा मृत्यू; भागदरा परिसरात शोककळा !
    क्राईम

    मका काढताना घडली दुर्घटना : ३७ वर्षीय योगेश पाटील यांचा मृत्यू; भागदरा परिसरात शोककळा !

    editor deskBy editor deskOctober 23, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जामनेर : प्रतिनिधी 

    तालुक्यातील भागदरा येथे काल सकाळी ११ वाजता  मका काढण्याचे काम सुरू असताना अचानक मशीनमध्ये अडकल्याने योगेश भावालाल पाटील (वय ३७) या तरुण शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.

    मिळालेल्या माहितीनुसार, योगेश पाटील हे स्वतःच्या मालकीच्या मशीनद्वारे शेतीकाम करत असताना ही दुर्घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, योगेश पाटील हे शेतीकाम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. शेतीला जोडधंदा म्हणून ते स्वतःचे मका काढण्याचे मशीनही चालवत होते. तर, भागदरा शिवारात दिनेश महाजन यांच्या शेतात मका काढण्याचे काम सुरू होते, त्यावेळी ही घटना घडली.

    घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय खंडारे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी करत माहिती जाणून घेतली. तर, आधीच निसर्गाने दिलेले दुष्काळी संकट त्यातच कष्ट करून कुटुंबाला आधार देणाऱ्या योगेश पाटील यांच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, मयत योगेश पाटील यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीवरून पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत योगेश पाटील यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, २ मुले, मुलगी असा परिवार आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी : कर्जमुक्ती योजनेची चौथी यादी जाहीर !

    October 23, 2026

    पाचोरा-वरखेडी मार्गावर मृत्यूचा सापळा : ट्रक उलटून हमालाचा बळी !

    October 23, 2026

    शनिपेठ पोलीस ठाण्यात मोठा बदल : डॉ. जयस्वाल यांची बदली, सागर शिंपींकडे अतिरिक्त जबाबदारी !

    October 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.