Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अजित पवारांचा राज ठाकरेंवर पलटवार म्हणाले हास्यस्पद …
    राजकारण

    अजित पवारांचा राज ठाकरेंवर पलटवार म्हणाले हास्यस्पद …

    editor deskBy editor deskDecember 2, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    राज ठाकरेंनी शरद पवारांवर केलेले आरोप हे धादांत खोटे आहेत. शरद पवारांना सारा महाराष्ट्र ओळखतो. त्यांनी कायम शाहू, फुले यांचे विचार डोळ्यासमोर ठेवून सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन जाण्याचे काम केले आहे,राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी जोरदार पलटवार केला आहे.

    अजित पवार पुढे म्हणाले की, बातम्या होतात म्हणून राज ठाकरे हे शरद पवारांवर टीका करतात. हेच राज ठाकरेंनी पवारांची मुलाखत घेतली होती. तेव्हा ते काय बोलत होते. असे दुटप्पी वागणे बरे नाही. शरद पवारांना संपुर्ण महाराष्ट्र 55 वर्षांपासून ओळखतो. राज ठाकरेंनी अशा प्रकारचे आरोप करणे हे हास्यपद आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना केलेल्या विधानामुळे महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री मिळण्याची चर्चा सुरु झाली आहे. यावर आज माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, कुणाच्या मनात काय यावं हा त्यांचा अधिकार आहे. उद्धव ठाकरेंच्या मनात तसे आले असेल म्हणून ते तसे बोलले असतील. उद्या कुणालाही मुख्यमंत्री करायचे म्हटले. पुरुषाला करा किंवा महिलेला करा नाहीतर कुणालाही करा. 145 हा बहुमताचा आकडा आहे. ज्यांच्याकडे हा आकडा असेल त्यांचा मुख्यमंत्री होईल.

    राज ठाकरे काय म्हणाले ?

    मुस्लिम मते दूर जातील, या भीतीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कधीही जाहीर भाषणांत छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत नाही. केवळ शाहु-फुले-आंबेडकरांचेच नाव घेतात, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    शहरात मोकाट कुत्र्यांचा रक्तरंजित धुमाकूळ; एका दिवसात २१ जखमी, प्रशासन झोपेत?

    April 26, 2026

    आ.गायकवाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर शिवसेनेची पलटी; “वैयक्तिक मत” म्हणत घेतली फारकत

    April 24, 2026

    बारामतीत ‘अघोरी’ दाव्यांनी खळबळ; अमोल मिटकरींच्या पोस्टनंतर राजकीय वातावरण तापले !

    April 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.