Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मुख्यमंत्री भ्रष्टाचार करून झाले ; पटोलेंचा घणाघात
    राजकारण

    मुख्यमंत्री भ्रष्टाचार करून झाले ; पटोलेंचा घणाघात

    editor deskBy editor deskDecember 1, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    राज्यातील विरोधी पक्षाचे नेते नेहमी सत्ताधाऱ्यावर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडत असतातच. पण थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गंभीर आरोप केला आहे. एकनाथ शिंदे हे भ्रष्टाचार करुन मुख्यमंत्री झाले आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे. पटोले यांच्या या विधानावरुन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

    पटोले म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल भाजपचे लोक वारंवार वादग्रस्त विधानं करत आहेत. त्यामुळं महाराजांच्या विचारांनी प्रेरित असलेले आणि भाजपला पाठिंबा देणारे किंवा भाजपत असलेले खासदार आणि आमदार यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या पदाचा राजीनामा देणार नाहीत कारण ते मोठ्या भय आणि भ्रष्टाचार करुन मुख्यमंत्री झाले आहेत”

    कारण एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा गवगवा करायचा आणि एकीकडं भाजपनं त्यांना अपमानित करत असेल तर त्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही ही महाराष्ट्राच्या जनतेची भूमिका आहे. कॉंग्रेस पक्षाची तर आहेच पण महाराष्ट्राची आहे, ही स्पष्ट भूमिका मी मांडतो आहे, असंही यावेळी नाना पटोले म्हणाले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    शहरात मोकाट कुत्र्यांचा रक्तरंजित धुमाकूळ; एका दिवसात २१ जखमी, प्रशासन झोपेत?

    April 26, 2026

    आ.गायकवाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर शिवसेनेची पलटी; “वैयक्तिक मत” म्हणत घेतली फारकत

    April 24, 2026

    बारामतीत ‘अघोरी’ दाव्यांनी खळबळ; अमोल मिटकरींच्या पोस्टनंतर राजकीय वातावरण तापले !

    April 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.