Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » शाळेतील ५ मुलांनी केले अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; पोलिसांनी घेतले ताब्यात !
    क्राईम

    शाळेतील ५ मुलांनी केले अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; पोलिसांनी घेतले ताब्यात !

    editor deskBy editor deskNovember 30, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

    इयत्ता 9 वी आणि दहावीत शिकणाऱ्या पाच अल्पवयीन मुलांना अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी हयातनगर पोलिसांनी मंगळवारी अटक केली. ही घटना ऑगस्टमध्ये घडली होती. परंतु, काही दिवसांपूर्वी कुटुंबीयांच्या लक्षात आल्यानंतर सोमवारी तक्रार दाखल केली.
    पाच मुलांपैकी तीनजण 15 वर्षांचे आहेत. एकजण दहावीच्या वर्गातील विद्यार्थी आहे, तर इतर दोघे 14 वर्षांचे आहेत. पीडित मुलगी 17 वर्षांची असून ती दहावीची विद्यार्थिनी आहे. पोलिसांनी सांगितलं की, आरोपी मुलांना पॉर्न व्हिडिओ बघण्याची सवय होती. शाळा सुटल्यानंतर अनेकदा ते त्यांच्या मोबाईलवर असे व्हिडिओ पाहायचे. ही सर्व रोजंदारी मजुरांची मुलं आहेत. पीडित मुलगी या मुलांना ओळखत होती. तिच्यावर ऑगस्ट महिन्यात 10 दिवसांच्या कालावधीत दोनदा अत्याचार झाला आहे. या दोन्ही प्रसंगांचं मुलांनी मोबाईलवर चित्रीकरण केलं, असं पोलीस म्हणाले.
    मुलांनी मैत्रीचा गैरफायदा घेत घरी कोणी नसताना मुलीचं लैंगिक शोषण केलं. त्यांच्यापैकी एकानं हा संपूर्ण प्रकार आपल्या मोबाईलमध्ये शूट केला. मुलीनं सांगितलं की, ‘त्यांनी व्हिडिओद्वारे मला ब्लॅकमेल केलं आणि 10 दिवसांनी पुन्हा माझं लैंगिक शोषण केलं.’ मुलांनी व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ शेअर केल्यानंतर ही घटना उघडकीस आली. पीडितेच्या कुटुंबीयांना घटनेचा व्हिडिओ समजल्यानंतर मुलीनं तिच्या पालकांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर पालकांनी पोलिसांकडं जाऊन पाच मुलांविरुद्ध तक्रार दाखल केली, असं एका पोलिस अधिकाऱ्यानं सांगितलं.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    रस्त्यावर वेगाचा कहर; जोरदार धडकेत ४९ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी अंत

    April 26, 2026

    भरवस्तीतून ३.११ लाखांचा गॅस माल गायब; चोरट्यांचा प्लॅनबद्ध डाव उघड

    April 26, 2026

    चुलत भावानेच घरात घुसून केला १० वर्षीय बालिकेचा विनयभंग !

    April 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.