Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धक्कादायक : बापाची हत्या करीत मृतदेह ठेवला फ्रीजमध्ये ; मायलेक पोलिसांच्या ताब्यात !
    क्राईम

    धक्कादायक : बापाची हत्या करीत मृतदेह ठेवला फ्रीजमध्ये ; मायलेक पोलिसांच्या ताब्यात !

    editor deskBy editor deskNovember 28, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

    देशात सर्वत्र श्रद्धा वालकर हत्याकांडांचा निषेध करण्यात येत असतानाच दिल्लीत अजून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पतीची मुलाच्या सहायाने हत्त्या करून फ्रीजमध्ये तुकडे ठेवल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मायलेकाला अटक केली आहे.

    अंजन दास असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. श्रद्धा हत्याकांडाप्रमाणे अंजन दासची हत्या करण्यात आली. त्यानंतर मायलेकांनी मृतदेहाचे तुकडे एक एक करुन फेकले. दिल्लीतील पांडवनगरमध्ये ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पूनम दास असे पत्नीचे तर दीपक दास असे मुलाचे नाव आहे. पूनम दासने पतीला आधी नशेच्या गोळ्या खाऊ घातल्या, त्यानंतर मुलाच्या मदतीने त्याची हत्या केली. अंजन दास याचे अनेक महिलांशी अनैतिक संबंध होते. यावरुन नेहमी घरात वाद होत असत. याच वादातून मायलेकांनी मिळून अंजन दासचा काटा काढला. अंजनची हत्या केल्यानंतर मायलेकांनी मृतदेहाचे तुकडे करुन फ्रिजरमध्ये लपवले. यानंतर संधी मिळेल तशी एक एक करुन तुकडे अक्षरधामसह पांडवनगर परिसरात विविध ठिकाणी फेकले.

    काही दिवसांपूर्वी पांडवनगर परिसरात पोलिसांनी मानवी मृतदेहाचे काही तुकडे सापडले होते. यानंतर पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरु केला. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळाच्या आसपासच्या परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले.
    सीसीटीव्ही तपासले असता पोलिसांनी घटनास्थळी एक महिला आणि एक तरुण संशयास्पदरित्या दिसून आले. पोलिसांनी त्या दोघांचा शोध घेत त्यांना ताब्यात घेतले. दोघांची कसून चौकशी केली असता मृतदेहाची ओळख पटली आणि हत्याकांडाचे रहस्य उलगडले. पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. तसेच आरोपींच्या घरातून मृतदेह ठेवलेला फ्रीजही जप्त करण्यात आला आहे. पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    विद्यापीठ व महाविद्यालयात दर्जेदार प्राध्यापकांसाठी मोठी भरती मोहीम

    February 22, 2026

    वकिलावर प्राणघातक हल्ला प्रकरण : तिघांवर गुन्हा दाखल !

    February 22, 2026

    अमळनेरातील डॉक्टराची एक कोटीत फसवणूक !

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.