Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मुख्यमंत्री शिंदे गुवाहाटीत दाखल !
    राजकारण

    मुख्यमंत्री शिंदे गुवाहाटीत दाखल !

    editor deskBy editor deskNovember 26, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    सहा महिन्यांपूर्वी शिंदे यांच्यासह ५० आमदार गुवाहाटीला गेले होते. त्या वेळी शिंदे हे मुख्यमंत्री व्हावे, असा नवस कामाख्या देवीला केला होता. हा नवस पूर्ण झाल्याने तो फेडण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे आपल्या सहकाऱ्यांसह निघाले आहेत. विशेष विमानाने आमदार आणि खासदार गुवाहाटीला जात आहेत. एकूण 180 जण विमानात आहेत. हे सर्व जण आज दुपारी साधारण 12 वाजेपर्यंत गुवाहाटीत उतरतील. त्यानंतर दुपारी ते देवीचे दर्शन घेतील.

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या गटातील आमदार, खासदारांना घेऊन आज पुन्हा गुवाहाटीला जात आहेत. गुवाहाटीला हे आमदार, खासदार कुटुंबासह कामाख्या देवीचे दर्शन घेणार आहेत. मुंबई विमानतळावरून शिंदे गट रवाना झाला असून थोड्याच वेळात गुवाहाटीला पोहोचण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुंबई विमानतळावर माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आम्ही राज्यातील बळीराजाला सुखी होऊ दे, जनतेच्या जीवनात अमूलाग्र बदल होऊ दे, राज्यावरील अरिष्ट जाऊ दे ही प्रार्थना कामाख्यादेवीकडे करणार आहोत. राज्यासाठीच आम्ही हे करत आहोत.

    तर, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी गुवाहटीवरून परतताना जास्त आमदार घेऊन येऊ, असे सूचक वक्तव्य केले आहे. त्यामुळे शिंदे गट या दौऱ्यात ठाकरे गटाला आणखी काही धक्का देणार का?, याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे. मुंबई विमानतळावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, गेल्यावेळी आम्ही गुवाहाटीवरून घाई गडबडीत आलो होतो. त्यामुळे आसामच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला पुन्हा येण्याचे निमंत्रण दिले होते. त्यानुसार आता श्रद्धेने जात आहोत. त्यात कुणाला काही वाटण्याची अवश्यकता आहे, असे वाटत नाही.

    मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आमचे सर्व आमदार उत्साहात आहेत. त्यांना दर्शन घेण्याचा उत्साह आहे. राज्यासाठीच आम्ही हे करत आहोत. राज्यातील बळीराजाला सुखी होऊ दे, जनतेच्या जीवनात अमूलाग्र बदल होऊ दे, राज्यावरील अरिष्ट जाऊ दे ही प्रार्थना करणार आहे. ही प्रामाणिक भावना आहे. हाच आमचा अजेंडा आहे. बाकी काही दुसरा आमचा अजेंडा नाही. कामाख्या देवीने आमची इच्छा पूर्ण केली. महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील सरकार स्थापन झाले. त्यामुळे देवीकडे आणखी काही मागण्याची गरज नाही, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026

    ग्रामपंचायत बंद आंदोलन: विकासकामांवर परिणाम, सरकारकडे मागणी थेट

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.