Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धक्कादायक : परिवारातील सहा लोकांचे संशयास्पदरित्या घरात आढळले मृतदेह !
    क्राईम

    धक्कादायक : परिवारातील सहा लोकांचे संशयास्पदरित्या घरात आढळले मृतदेह !

    editor deskBy editor deskNovember 21, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    राजस्थानमधील उदयपूर जिल्ह्यातील एकाच कुटुंबातील सहा लोकांचे संशयास्पदरित्या घरात मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये आई-वडिल आणि चार मुलांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. सर्व मृतदेह ताब्यात घेत पोलिसांनी शवविच्छेदनासाठी पाठवले.

    कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केली की त्यांची हत्या झाली याबाबत अद्याप कोणताही खुलासा होऊ शकला नाही. पोलीस याप्रकरणी सखोल तपास करत आहेत. प्रकाश गमेती आणि दुर्गा गमेती अशी मयत जोडप्याची नावे असून, त्यांच्या चार मुलांचाही मृत्यू झाला आहे.
    घटनास्थळी डॉग स्कॉड पण दाखल झाले असून, घरातील प्रत्येक वस्तू तपासण्यात येत आहे. प्रथमदर्शनी आर्थिक विवंचनेतून कुटुंबाने आत्महत्या केल्याचे दिसत आहे. दुर्गाचा मृतदेह जमिनीवर पडला होता. प्रकाशने आधी सर्वांची गळा दाबून हत्या केली आणि मग मृतदेह दुपट्टा आणि साडीच्या सहाय्याने लटकवले, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. प्रकाश गुजरातमध्ये नोकरी करत होता.

    शेताजवळ प्रकाश आणि त्याचे दोन भाऊ राहत होते. प्रकाशच्या दोन्ही भावांची स्वतंत्र घरे आहेत. प्रकाशच्या भावानेच घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीस सर्व बाजूने घटनेचा तपास करत आहेत. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच हत्येचे नेमके कारण स्पष्ट होईल.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    रस्त्यावर वेगाचा कहर; जोरदार धडकेत ४९ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी अंत

    April 26, 2026

    भरवस्तीतून ३.११ लाखांचा गॅस माल गायब; चोरट्यांचा प्लॅनबद्ध डाव उघड

    April 26, 2026

    चुलत भावानेच घरात घुसून केला १० वर्षीय बालिकेचा विनयभंग !

    April 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.