Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दिरानेच केला वहिनीचा विनयभंग ; गुन्हा दाखल
    क्राईम

    दिरानेच केला वहिनीचा विनयभंग ; गुन्हा दाखल

    editor deskBy editor deskNovember 19, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव : प्रतिनिधी 

    तालुक्यातील एका खेडेगावात दारूच्या नशेत दिराने आपल्या वहिनीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी धरणगाव पोलिसात पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेने या आधी एका प्रकरणात दोन्ही दिरांविरोधात पोलिस तक्रार केली होती. ती तक्रार मागे घेण्यासाठी दोघांनीही तिला धमकी दिली आणि विनयभंग केला.

    पीडित महिलेने आपल्या दोन्ही दिरांविरुद्ध यापूर्वी पोलिसात तक्रार दिली होती. याचा राग मनात धरून काही दिवसांपूर्वी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास दारूच्या नशेत घरात प्रवेश केला आणि तक्रार मागे घेण्याची धमकी दिली, तसेच मुलीचे अपहरण करण्याची धमकीही दिली. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा पहाटेच्या सुमारास दुसऱ्या दिराने महिलेला लज्जा वाटेल, असे कृत्य केले. ही बाब मुलीने पाहताच तो पळून गेला. त्यानंतर, महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पुढील तपास पो.हे.कॉ. उमेश भालेराव हे करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    वकिलावर प्राणघातक हल्ला प्रकरण : तिघांवर गुन्हा दाखल !

    February 22, 2026

    अमळनेरातील डॉक्टराची एक कोटीत फसवणूक !

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.