Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » आनंद तेलतुंबडे यांना जामीन मंजूर ; भीमा कोरेगांव हिंसाचार प्रकरणी दिलासा !
    क्राईम

    आनंद तेलतुंबडे यांना जामीन मंजूर ; भीमा कोरेगांव हिंसाचार प्रकरणी दिलासा !

    editor deskBy editor deskNovember 18, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    भीमा कोरेगांव हिंसाचार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आनंद तेलतुंबडे यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयानं आज शुक्रवार त्यांचा जामीन मंजूर केला. तेलतुंबडे यांना 2020 पासून तळोजा तुरुंगात ठेवण्यात आलं आहे. भीमा – कोरेगाव प्रकरणातील संशयित आनंद तेलतुंबडेंना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. 1 लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. एनआयएच्या सुप्रीम कोर्टात अपील करण्याच्या विनंतीवरून उच्च न्यायालयाने आदेशाला एका आठवडयाची स्थगिती दिली आहे.

    अर्बन नक्षलवाद प्रकरणी आयआयटीचे प्राध्यापक व दलित विचारवंत आनंद तेलतुंबडे यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. तेलतुंबडे यांचे बंदी घातलेल्या ‘सीपीआय’ (माओवादी) या संघटनेशी संबंध असलेल्या आरोप एनआयएने आरोपपत्रात केला होता. प्रा. तेलतुंबडे यांना भीमा कोरेगाव-एल्गार परिषदेत त्यांचा सक्रीय सहभाग होता असा आरोप ही त्यांच्यावर होता. या प्रकरणी 14 एप्रिल 2020 मध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणेने अटक केली होती. तेव्हापासून ते तुरुंगात आहेत.

    आनंद तेलतुंबडे यांना जामीन मिळाला असले तरी पुढील 7 दिवस त्यांची कारागृहातून सुटका होऊ शकणार नाही. कारण ‘एनआयए’ने सुप्रीम कोर्टात अपील करण्यासाठी वेळ मागत विनंती केली आहे. हायकोर्टाने ही विनंती मंजूर केल्याने पुढील 7 दिवस आनंद तेलतुंबडे यांना कारागृहातच रहावे लागणार आहे. माझ्याविरोधात काहीच पुरावे नसून जातीसयवादी शक्तीकडून मला जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात आहे, असे जामीनासाठी केलेल्या अर्जात तेलतुंबडे यांनी म्हटले आहे.

    # AnandTeltumbde
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.